कृषीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांचे चक्री उपोषण

आंदोलन  तीव्र करणार असल्याची शेतकरी प्रल्हाद  वारघडे यांची माहिती

महासंदेश : पुणे येथील हवेली उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर रिंगरोड विरोधात रिंग रोड बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी चक्री उपोषण सुरू केले असून, प्रशासनाने याची दखल लवकरात लवकर घेतली नाही तर आंदोलन तीव्र करणार असल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधी प्रल्हाद वारघडे यांनी दिली.

रिंग रोड विरोधात शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी रिंग रोड विरोधी कृती समितीच्या माध्यमातून चक्री उपोषण हे  गाथा वाचन करून उगारला आसूड, या ब्रीद वाक्य ला अनुसरून सुरू करण्यात आले आहेत. हवेली तालुक्यातील अनेक   गावातील शेतकरी  या आंदोलनात उतरले असून त्यांनी हवेलीच्या उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन  सुरू केले असल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधी प्रल्हाद वारखेडे यांनी दिली आहे. सरकार जाणीवपूर्वक 7/12 उतारेवर नोंदी टाकून, पोलीस बाळाचा वापर करून मोजण्या करणे, शेतकऱ्यांना विचारात न घेता रिंग रोड साठी क्षेत्र  ताब्यात घेणे असे प्रकार करू लागल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे . एकशे दहा मीटर शेत जमीन संपादित होणार असून ती अवास्तव  आहे. तसेच विकास कामाच्या नावाखाली भांडवलदार हिताचा निर्णय शासन घेत आहे. शेत जमिनीचा मोबदला याबत कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून लेखी स्वरूपात सादर केली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. रिंग रोड साठी तसेच रेल्वे प्रकल्पासाठी शेत जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना या दोन्ही प्रकल्पासाठी आपल्या जमिनी शासनाला द्यावे लागणार आहेत. याशिवाय यापूर्वीच्या प्रकल्पांबाबत संभ्रमावस्था असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचे प्रल्हाद वारघडे यांनी सांगितले आहे. गावोगावची शेतकरी रोज चक्री उपोषणास बसत असून शेतकऱ्यांचा या उपोषणाला पाठिंबा वाढत असून प्रशासनाने तातडीने या कामी लक्ष देऊन शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Back to top button