अहमदनगर

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना भक्कम : प्रा. गाडे

महासंदेश : गेल्या पंधरा वर्षापासून नगर तालुका शांत आहे. कारण शिवसेनेने संयम ठेवला आहे. जे काय करायचे ते आंदोलनाच्या माध्यमातून करायचे. शेतकऱ्यांचे असो व सर्व सामन्यांचे प्रश्न सोडवणे हाच उद्देश शिवसेनेचा आहे. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करायचे ही शिकवण शिवसेनेची आहे.  नागरिकांचे प्रश्न हे गाव पातळीवरच सोडविण्यासाठी ‘गाव तेथे शाखा” उघडण्याचे काम हाती घेतले असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी म्हटले.


नगर तालुक्यातील मांजरसुंभा येथे शिवसेनेच्या शाखा  फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प.सदस्य गोविंद मोकाटे, तालुकाअध्यक्ष राजेंद्र भागत, रघुनाथ झिने, उपसभापती दिलीप पवार, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, देविदास कदम, दादू वाघमारे, प्रशांत कदम, सूर्यभान कदम, किरण कदम, सागर कदम,  अंकुश कदम, नानासाहेब कदम, राम कदम, विश्वास कदम, अशोक नालकर, संभाजी कदम, अमोल कदम, भीमा कदम, दत्तात्रय कदम, साहेबराव वाघमारे, दत्तू कदम, भाऊसाहेब कदम आदीसह नागरीक उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाल नगर तालुका प्रमुख राजेंद्र भागत यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील 105 गावात शिवसेना भक्कम करण्यासाठी व एक युवकांची नवी फळी तयार करण्यासाठी गाव तेथे शिवसैनिक घडविण्याचे काम सुरु असल्याचे, माजी सभापती रघुनाथ झिने यांनी म्हटले.

गोविंद मोकाटे म्हणाले, गेली २५ वर्ष राहुरी- नगर- पाथर्डी मतदार संघात फक्त विकास कामांचे उद्घाटने झाली. मात्र, प्रत्यक्षात कामे झाली नाही. त्यामुळे जनतेने त्यांना घरी बसविले. त्यामुळे त्यांनी कुरुघोड्याचे राजकारण सुरु केले असून,  विकासकामात खोडा आणण्याचे काम होत आहे. मात्र या विकासकामांना जनतेचा पाठिंबा आहे. 

Back to top button