अहमदनगरकृषीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल कृषी विद्यापीठांनीही घ्यावी : कृषिमंत्री दादाजी भुसे

महासंदेश : करोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे शहरात पुन्हा सोमवार (दि. 28) पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज संध्याकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिकांनी विनाकारण भटकंती करता येणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर फिरणाऱ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

 करोना रूग्णांची वाढती संख्या आणि साखळी तोडण्यासाठी कडक निर्बध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनो घरातच बसा, विनाकारण भटकंती करू नका, अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नाकाबंदीदरम्यान बेशिस्त आणि विनाकारण वाहनचालकांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. शहरात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे पोलिसांनी बेशिस्तांविरूद्ध कारवाईची मोहित हाती घेतली आहे. त्यानुसार जागोजागी नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि चेविंâगला प्राधान्य दिले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल कृषी विद्यापीठांनीही घ्यावी : कृषिमंत्री दादाजी भुसे

अहमदनगर :  कृषी विद्यापीठांमध्ये कृषी विषयक विविध बाबींवर संशोधन होत असताना राज्यात ठिकठिकाणी शेतकरी वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना पाठबळ म्हणून राज्यात अशा प्रयोगशील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठांनीही त्यांच्या या प्रयोगांची दखल घ्यावी आणि याबाबत त्यांना अधिक मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील नानासाहेब पवार सभागृहात सोमवारी (दि.२८) कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे कृषी संजीवनी मोहीमे अंतर्गत कृषीमंत्री दादा भुसे यांनी फळपीके उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, कृषी संचालक विकास पाटील, कैलास मोते, सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, उपसंचालक विलास नलगे तसेच उद्यानपंडित पुरस्कार विजेते युवा शेतकरी राहुल रसाळ हे व्यासपीठावर उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणाली द्वारे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्यासह विविध भागातून शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी भुसे म्हणाले की, सध्या अनेक शेतकरी त्यांच्या शेतीमध्ये विविध प्रयोग करत आहेत. त्यांच्या या संकल्पना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपण अशा पाच हजाराहून अधिक शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक बनवली आहे. त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमात कृषी विद्यापीठाचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात फळपीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला ही आनंदाची बाब आहे. फळपीक उत्पादनात नाविन्यपूर्ण उपक्रमावर भर आहे. फळपीकातील प्रयोगशील शेतकरी व कृषी विद्यापीठाच्या मदतीने जास्ती काळ फळ टिकणारे वाण विकसीत करण्यावर भर दिला जाणार आहे असे ते म्हणाले.  

गेल्या वर्षी साधारण पाच हजार आठशे कोटी रुपयाचे विमा हप्ता जमा झाला, मात्र अवघे 900 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली. त्यामुळे विमा योजनेचे नवे मॉडेल आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप त्यास केंद्राने मान्यता दिलेली नसल्याने मागच्या वर्षी असणारी योजनाच यावर्षी राबविली जात आहे. फळबाग पीक विमा योजना ऐच्छिक असून त्यातील अटी आणि शर्तींचा विचार करुन शेतकऱ्यांनी ती स्वीकारायची किंवा नाही, याचा निर्णय घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शेतकरी

यावेळी कृषीमंत्री भुसे यांच्या हस्ते फळपीक उत्पादनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शेतकरी तसेच फळपीक लागवडीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या कृषी सहायकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी सचीव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त धीरजकुमार यांनीही शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. या संवादात दीपा ससे, राहुल रसाळ, आनंदराव गाडेकर, संगीता मारूती डाके, बाळासाहेब कारखिले, समाधान भोसले (पापरी ता. मोहोळ), निर्मला खुबाळकर (खुबाळा ता. सावनेर), रमेश जिचकार (नागझरे, अमरावती),  शिवराज येरनाळे (तोगरी ता. उदगीर),  सुरेश नवले (अकोले) या शेतकरयाशी कृषी मंत्री श्री. भुसे यांनी संवाद साधला. भुसे यानी फळबाग लागवडीबाबत चर्चा करून माहिती विचारली. निघोज (पारनेर) येथील युवा शेतकरी राहुल रसाळ यांच्या करटुले शेतीप्रयोगाचे त्यांनी कौतुक करत त्याची पाठ थोपटली.

Back to top button