अहमदनगरमहाराष्ट्र

शेतीच्या बदल्यात शेती द्या!

सुरत – हैदराबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे च्या 71 हरकतीवर सुनावनी

नगर, दि. 11 (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या भारतमाला प्रकल्पातील सुरत-हैद्राबाद एक्सप्रेस-वे च्या मार्गासाठी नगर जिल्ह्यातील भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आज (दि.11) रोजी नगर तालुक्यातील मांजरसुंबा गावातील 71 हरकतीवर सुनावनी झाली. या सुनावनी दरम्यान शेतकर्‍यांनी जमिनी देण्यास तिव्र विरोध करत जमिनिच्या बदल्यात जमिनी द्याव्यात, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील भुसंपादन अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या समोर सुनावनी झाली.

यावेळी मांजरसुंबा गावातील गोरक्षनाथ कदम, जयराम कदम, गोवर्धन कदम, आंबादास कदम, चंद्रभान कदम, भाऊ कदम, अर्जुन कदम, दत्तात्रय कदम, सुरेश कदम, शिवाजी कदम, छगन कदम, बाळासाहेब पटारे, राजेंद्र कदम, संतोष कदम, दादासाहेब कदम, नंदू कदम, देविदास कदम, बापू कदम, अजय कदम, विलास कदम, संतोष कदम, बाबासाहेब कदम, देविदास कदम, आदीसंह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


सुरत-हैद्राबाद महामार्गासाठी जमीन संपादित करण्याबाबत शेतकर्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. आज त्यावर शेतकर्यांनी तिव्र विरोध करत शेतकरी अल्पभुधारक असून रस्त्यात जमिनी गेल्यास शेतकरी भुमिहिन होइल. तसेच गावात प्रदूषण होवून इतर शेती ना पिक होइल. गावातील सर्व शेतकरी व त्यांचे कुटुंबाची उपजीविका ही शेतीवर अवलंबून असल्याने त्यांच्यावर शेतकर्यांवर उपासमारीची वेळ येइल. तसेच शासनाने तीन वर्षावरील खरेदी-विक्री व्यवहाराची सरासरी काढून मोबदला देण्याच्या निर्णयावर नाराजी शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

कोट…
सुरत-हैद्राबाद एक्सप्रसे-वे च्या मार्गासाठी नगर जिल्ह्यातील भूसंपदनाच्या नोटीसा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर आज नगर तालुक्यातील मांजरसुंबा गावातील 71 हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर शेतातील झाडे, फळबाग तसेच सिंचनांच्या साधनांचे योग्य ते मुल्यांकण करून शेतकर्‍यांना मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.
सिद्धार्थ भंडारे
भुसंपादन अधिकारी क्र.1

चौकट…
सुरत-हैद्राबाद मार्गाच्या भुसंपदानासाठी आमच्या जमिनी जात आहेत. त्या जमिनिचा योग्य तो मोबदला दिला जावा. तसेच जे शेतकरी भुमिहीन होत आहेत, त्यांना शासनाने तरतुद करून त्यांना जमिनी दिल्या पाहिजे. शासनाने लावलेल्या निकषानुसार मांजरसुंब्यात तीन वर्षाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहारानुसार मोबदला दिला जाणार आहे. त्याला आमचा विरोध आहे.
गोरक्षनाथ कदम
मांजरसुंबा शेतकरी

चौकट…
मी आधीच अल्पभुधारक ; रस्ता गेल्यावर भुमिहिन होइल
माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर असून मी आधीच अल्पभुधारक आहे. त्यात सुरत-हैद्राबाद महामार्ग गावातून गेल्यास मी भुमिहिन होइल. माझे कुटुंब रस्त्यावर येइल. नाइलाजास्तव गाव सोडावे लागेल. आमचा रस्त्याला विरोध नाही, सरकारने आम्हाला शेतीच्या बदल्यात शेती द्यावी.

राजेंद्र कदम
मांजरसुंबा ग्रामस्थ

Back to top button