अहमदनगर

श्रीराम विद्यालयाच्या प्राचार्यपदी संभाजी पवार

महासंदेश :  नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी संभाजी पवार यांची नुकतीच निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांच्या मूळ गावी टाकळी काझी येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रा.शहाजी आटोळे होते. या प्रसंगी उपसरपंच अविनाश पवार म्हणाले, स्वीकारलेल्या कामात झोकून देण्याचं स्वभावामुळे संभाजी पवार संस्थेच्या व विद्यालयाच्या लौकिकात नक्कीच भर घालतील. करोना काळात गरिबांना मदत व गावातील गरीब व भटक्या मुलांसाठी गावपातळीवर त्यांनी केलेले प्रयत्न श्रीराम विद्यालयाच्या कामी येतील. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य संभाजी पवार यांनी ग्रामस्थांचे आभार मानून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. या वेळी मदडगावचे सरपंच अनिल शेडाळे, देवराम ढगे, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, अशोक ढगे, लहानू  म्हस्के,  शंकर ढगे, संतोष ढगे आदी उपस्थित होते.

Back to top button