देश-विदेशमहाराष्ट्र

सत्ताधाऱ्यांचा नादच खुळा! भाजपच्या ‘या’ नेत्याचा आरोप

महासंदेश : सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची चांगलीच दाणादाण उडवून दिली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या प्रचंड रांगाच रांगा लागल्याने अनेकांना कारमध्येच तिष्ठत बसावे लागले होते. वरून कोसळणारा धोधो पाऊस आणि वाहतूककोंडीत तिष्ठत बसावे लागत असल्याने चाकरमानी संतापले होते. सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. मात्र, लोकल ठप्प झाल्याने चाकरमानी चांगलेच वैतागले आहेत.

 पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी झाल्याने भाजपने शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. सत्तासत्ताधाऱ्यांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा, अशा काव्यमय शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच महापालिकेत पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. ते म्हणाले की , मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलंय. घरात पाणी घुसू लागले आहे , नालेसफाई कधी १०७ तर कधी १०४ टक्के  झाल्याच्या दाव्यांचे आकडे पहिल्याच पावसात ‘कटकमिशन’चे सगळे व्यवहार उघडे पडले आहेत.

Back to top button