अहमदनगर

समाजकारण केल्याने गावाला गावपण : जालिंदर कदम

समाजकारण केल्याने गावाला गावपण : जालिंदर कदम
मांजरसुंब्यात क्रांतिविकास पॅनलचा प्रचार शुभारंभ
नगर, दि.8 (प्रतिनिधी) – गावपण असणार्‍या गावात काम करण्यासाठी गल्ली आहे, रस्ते, नळ, लाइट, असे विविध कामे प्रत्येक नागरिकांना करता येतात. मात्र, आमच्या गावामध्ये गावपण करण्यासाठी आम्हाला आज पर्यंत प्रयत्न करावा लागला आहे. गावात कुठली गल्ली नव्हती. फक्त एक वृक्षाच झाड होत. व एक शाळा होती. त्यामुळे मांजरसुंब्याच एक अस्तीत्व एक नाव तयार करण्यासाठी आम्हाला 25 वर्ष काम करावे लागले, त्यामुळे आज मांजरसुंब्याच नाव तालुक्यासह, जिल्हा, राज्यात नेण्याचे काम आम्ही केले आहे. त्यामुळे गावचा विकास करायचा असेल तर मतदार राजा आहे. त्यांनी पुन्हा क्रांतिविकास पॅनला बहुमताने विजयी करावे असे,  जालिंदर कदम म्हणाले.
नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे क्रांतिविकास पॅनलचा ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तुकाराम कदम होते. यावेळी किरण कदम, ज्ञानेश्‍वरी कदम, मंगल कदम, कविता वाघमारे, रुपाली कदम, प्रशांत कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालिंदर कदम यांनी गावचा विकास हिच संकल्पना मनात ठेवून गावात विकासकार्य सुरू आहे. गावचे नाव आज आदर्श गाव हिवरे बाजार, तसेच राळेगण सिद्धी या गावच्या पाठोपाठ आज मांजरसुंब्याचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनता विकासालाच मत देवून जनता पुन्हा क्रांतिविकासपॅनला सत्तेत बसवेल, असा विश्‍वास आंबासाहेब कदम यांनी व्यक्त केला.
तुकाराम कदम म्हणाले,  गावाला पुढे नेण्यासाठी जालिंदर कदम यांचे प्रयत्न सुरु आहेत. आज होउ घातलेल्या निवडणुकीत मतदारांने आपले मत विकासाला द्यावे, गावाच्या उन्नतीसाठी द्या, चांगल्या कामाला देवून गावच्या विकासात हात भार लावून क्रांतिविकास पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे ते म्हणाले. यावेळी राजू कदम, मिनाक्षी कदम, रुपाली कदम यांनी मनोगत व्यक्त केले.  

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button