अहमदनगरमहाराष्ट्र

सर्वसामान्यांचे प्रश्‍न तत्काळ मार्गी लागणार : नंदू गागरे

सर्वसामान्यांचे प्रश्‍न तत्काळ मार्गी लागणार : नंदू गागरे
नगरविकास मंत्री तथा राहुरी नगर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
नगर, दि.21 (प्रतिनिधी) – नगर-राहुरी मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणींचे तत्काळ निवारण करण्यासाठी शेंडी येथे राज्य मंत्री तथा राहुरी मतदार संघाचे लोकप्रतिनिधी प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामन्य नागरिकांचे प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नंदू गागरे यांनी दिली.
नगरविकास मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा नगर राहुरी विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधी प्रजाक्त तनपुरे यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाट व नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर तालुक्यातील शेंडी येथील दत्त मंदिर चौक येथे शनिवार (दि.23) रोजी सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.  
या उद्घाटन प्रसंगी नगर दक्षिण शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस घनशाम शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेचे प्रताप शेळके, शिवाजी तवले, उद्धवराव दुसुंगे, जगन्नाथ निमसे, अमोल जाधव, रघुनाथ झिने, गोविंद मोकाटे, बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, राजेंद्र भगत, रोहिदास कर्डिले, बाळासाहेब कराळे, शिवाजी चव्हाण, प्रविण कोकाटे, रामेश्‍वर निमसे, बबन पटारे, अशोक मते, भास्कर मगर आदी सह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button