अहमदनगर

सलूनसह छोट्या व्यवसायिंकांची दुकाने उघडण्यास परवानगी द्या : श्याम औटी

अहमदनगर : शहरातील रुग्णसंख्या कमी होत असून नियम अटींचे पालन करून सलूनसह सर्व दुकाने उघडण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी ओबीसी बाराबलुतेदार महासंघाचे शहराध्यक्ष शाम औटी यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदन पाठवून केली आहे.

कोरोनाची पहिली लाट ओसरली आणि शहरातील व्यवसाय धीम्या गतीने सुरु झाले होते. व्यावसायिकांची आर्थिक घडी बसण्या पूर्वीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पूर्ववत लॉकडाऊन आणि सर्व व्यवहार पुन्हा ठप्प झाल्याने छोट्या व्यावसायिकांचे हाल होताहेत.सलूनसारख्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या सर्वच बाराबलुतेदारांना याचा मोठा आर्थिक फटका बसला असून हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना या काळात खरंतर शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करून औटी यांनी केली.


यांनी ओबीसी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माउली गायकवाड, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, ओबीसी १२ बलुतेदार महासंघाचे जिल्हाउपाध्यक्ष अनिल इवळे,  युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष आर्यन गिरमे, नाभिक राज्य मीडिया प्रमुख अजय रंधवे, १२ बलुतैदार महासंघाचे कार्याध्यक्ष रमेश बिडवे, महिला शहर जिल्हाध्यक्षा अनुरिता झगडे, महिला जिल्हाध्यक्षा मनीषा गुरव, नाभिक महिला जिल्हाध्यक्षा वनिता बिडवे, जिल्हा उपाध्यक्षा सुलभा सटाणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी,सदस्यांनी केली आहे.

36 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button