महाराष्ट्र

सामाईक विहिरीचे पाणी भरण्याच्या कारणातुन पुतण्याने चुलत्याच्या डोक्यात घातला दगड !

अहमदनगर : सध्या ग्रामीण भागात सामाईक शेती, बांध, विहिरीच्या मुद्यांवरून अनेकवेळा वाद होतात. नुकतीच सामाईक विहिरीतील पाणी भरण्याच्या कारणावरुन पुतण्याने चुलत्याच्या डोक्यात दगड घातला. यात चुलता बादशाह पठाण यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेदरम्यान बीड बायपास रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी जखमी बादशाह पठाण यांचा मुलगा समीर पठाण याच्या तक्रारीवरुन इमराचा चुलत भाऊ इमरान अकबर पठाण, अकबर उस्मान पठाण आणि रजीया अकबर पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दाखल तक्रारीनुसार पठाण या दोन्ही कुटूंबांची सामाईक विहीर आहे. या विहिरीतील पाणी भरण्याच्या कारणावरुन इमरानसह त्याच्या आईवडीलांनी संगनमत करुन समीरचे वडील बादशाह पठाण यांना मारहाण केली. इमरानने बादशाह यांना लोखंडी रॉडने मारुन जखमी केले. ते खाली पडल्यानंतर दगड उचलून ‘इसे तो जान से खतम करता हुं’ असे म्हणत बादशाह याच्या डोक्यात दगड घातला. या ते गंभीर जखमी झाले. तसेच अकबर याने लाकडी दांड्याने बादशाह यांना मारहाण केली.
दरम्यान, फिर्यादी समीर आणि त्याची आई भांडण सोडवण्यासाठी गेले असता इमरान याने लोखंडी रॉडने हातावर व पाठीवर व डोक्यावर मारहाण केली. यात समीरचा हात फ्रॅक्चर झाला तर त्याच्या आईला डोक्याला फ्रॅक्चर झाले. रजीया हिने समीरच्या आईला मारहाण केली. तक्रारीवरुन तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button