अहमदनगर

सुयोग्य संस्कार घडवून निकोप पिढी घडविण्यासाठी बाल संस्कार शिबीर ही काळाची गरज : दत्तात्रय महाराज सुद्रीक

धनगरवाडी येथे बाल संस्कार शिबिराचे उद्घाटन

अहमदनगर, दि.5 (प्रतिनिधी) : देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांवर सुयोग्य संस्कार घडवून निकोप पिढी घडविण्यासाठी बाल संस्कार शिबीर ही काळाची गरज बनली आहे. मुलांवर संस्कार केले तर, संस्कृती टिकेल असा विश्वास दत्तात्रय महाराज सुद्रीक यांनी व्यक्त केले.

नगर तालुक्यातील धनगरवाडी, जेऊर (बा) येथील चंद्रभागा मंगल कार्यालय येथे गुरुवार (दि.५) रोजी बालसंस्कार शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. हे शिबीर 20 दिवस सुरू राहणार आहे.


यावेळी रामकृष्ण महाराज शास्त्री, मुळे महाराज, म्हस्के महाराज, सुदाम महाराज दारकुंडे, ज्ञानेश्वरी ससे, सोहम महाराज मगर, अनुष्का टापरे, शरद तवले, सरपंच अण्णासाहेब मगर, मधुकर मगर, संदीप शिकारे, महादेव तागड, बाबासाहेब शिकारे, इंद्रभान विरकर, आदर्श गाव मांजरसुम्ब्याचे उपसरपंच जालिंदर कदम आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.


सुहम महाराज मगर यांच्या मार्गदर्शनाखाली २१ दिवशीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या बाल संस्कार शिबिरात पहिल्याच दिवशी 25 विद्यार्ही दाखल झाले होते.
या शिबिरात दररोज दैनंदिन स्रोत, विष्णू सहस्त्र नाम, गीता पाठ, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, प्रवचन, मृदुंग, तसेच अध्यात्मिक शिक्षण दिले जाणार आहे.
हे शिबीर यशस्वीतेसाठी गायनाचार्य सोहम महाराज मगर, अभिषेक महाराज मस्के, आनंद महाराज तागड, समर्थ महाराज आढाव हे परिश्रम घेत आहेत.

Back to top button