अहमदनगरमहाराष्ट्र

सोसायटीच्या चेअरमनसह १२ जणांवर ‘हा’ गंभीर गुन्हा दाखल

अहमदनगर  : जमिनीच्या वादातून श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह १२ जणांवर बेलवंडी पोलिस ठाण्यात विनयभंगासह,ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यातील ३ आरोपींना अटक केली. तर चेअरमनसह ९ आरोपी पसार झाले आहेत.
  येथील रोहिदास गबाजी धस यांची शेती सुमारे दीड वर्षापूर्वी इसार पावती करुन फिर्यादीने विकत घेतली असताना तीच जमीन रोहिदास धस व भरत धस यांनी दिपाली मनोहर लाटे व सोनाली धनंजय लाटे यांना परस्पर विकली. या बाबत श्रीगोंदा न्यायालयात दावा चालु असताना दि.२३ जून रोजी फिर्यादी व फिर्यादीची सासू,सासरा व मुलगा असे सर्वजन शेताच्या बांधालगत असताना मनोहर सुधाकर लाटे, धनंजय सुधाकर लाटे, सुधाकर पांडुरंग लाटे, मिरा सुधाकर लाटे, सुभाष बापुराव लाटे, लक्ष्मण भगवान लाटे, रोहिदास गबाजी धस, विलास रघुनाथ धस, बाळु रघुनाथ धस, संजय हरिभाऊ धस, कैलास हरिभाऊ धस, मारुती किसन सातपुते, नवनाथ मारुती सातपुते यांनी एकत्र येवुन आम्ही इसार पावती केलेल्या शेतात ट्रॅक्टर घालून मुगाचे पीक पेरले असताना फिर्यादीचे सासु, सासरे, मुलगा समजावून सांगत असताना त्यांनी एकत्रित जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केली. तर धनंजय लाटे, मनोहर लाटे, कैलास धस, विलास धस, रोहिदास धस यांनी फिर्यादीचा हात धरला. तसेच गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून वरील १२ जनांवर विनयभंगासह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button