स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; बँकेने केलाय ‘हा’ बदल

महासंदेश: करोनाच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने मोठी सुविधा ग्राहकांसाठी दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) नॉन-ब्रँच शाखांसाठी रोख पैसे काढण्याची मर्यादा तात्पुरती वाढविली आहे. याशिवाय बँकेने शाखांमध्ये नॉन-होम थर्ड पार्टी रोख रक्कम काढण्यासही मान्यता दिली आहे. यामुळे अशा ग्राहकांना दिलासा मिळेल, जे कोणत्याही कारणास्तव रोख रक्कम काढण्यासाठी त्यांच्या गृह शाखेत जाऊ शकत नाहीत. ग्राहक त्यांच्या इमर्जन्सी लागणारी पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी संबंधित बँकेच्या शाखेत जाणे टाळतील आणि त्यांची गरजही पूर्ण होईल. एसबीआयने नॉन-होम शाखेतून रोख पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे ती 50,000 रुपयांवरून एक लाखांपर्यंत केली आहे.
* आतापर्यंत 50 हजार रुपयांची मर्यादा होती
यापूर्वी एसबीआय ग्राहक धनादेशाद्वारे नॉन-होम ब्रांचमधून फक्त 50 हजार रुपये काढू शकत होते. आता ही मर्यादा दुप्पट करून 1 लाख रुपये केली आहे. याशिवाय बचत खात्याच्या पासबुकद्वारे पैसे काढण्याचे फॉर्म भरून आपण 25000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकता. आतापर्यंतची मर्यादा फक्त 5000 रुपये होती.
* कधीपर्यंत मिळेल सवलत ?
‘पर्सनल’ कॅटेगिरीमधील ग्राहक 30-सप्टेंबर 2021 पर्यंत नॉन-होम व्यवहार लिमिटमध्ये या अपडेटचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, एसबीआयने रोख रक्कम काढणे आणि चेक बुक फी वाढविली आहे. एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खातेधारकांवर 1 जुलै 2021 पासून नवीन सेवा शुल्क लागू करेल. 1 जुलैपासून एटीएममधून रोकड काढण्यासाठी, चेक बुक, हस्तांतरण आणि इतर बिगर आर्थिक व्यवहारांवर नवीन शुल्क आकारले जाईल