अहमदनगर

स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर : कोरोना महामारी निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी स्वयंभू युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने तसेच स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने महारक्तदान शिबिराचे आयोजन न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन अभिनाथ शिंदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य बाळासाहेब सांगडे यावेळी उपस्थित होते.

स्वयंभू युवा प्रतिष्ठान गेल्या ४ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत रक्तदान शिबिर वृक्षारोपण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असे विविध उपक्रम या प्रतिष्ठान मार्फत घेतले जात आहेत 900 रुग्णांना मोफत ब्लड बॅक पुरवले आहेत तर 1000 ब्लड बँक शिल्लक आहेत.

कोरोनाने दाखवून दिला आहे की रक्ताची खूप गरज आहे. त्यामध्ये महिला ,वृद्ध ,लहान मुले अशा सगळ्या ना रक्ताची गरज आहे. जे कोणत्या कारखान्यात तयार होत नाही तर माणसाच्या शरीरातच तयार होतं आणि कुठेतरी आपल्याला माणूस म्हणून दुसऱ्या माणसाला मदत करण्याची गरज असते प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान करत आहेत ते नक्कीच कोणत्यातरी व्यक्तीचा जीव वाचू शकतो म्हणून आपण म्हणतो की सर्वात श्रेष्ठ दान असतं ते रक्तदान आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदान केलं पाहिजे आणि युवकांनी पुढे आले पाहिजे अशी भावना उपप्राचार्य बाळासाहेब सागडे यांनी व्यक्त केलं. यावेळी रक्तदान करणार्या प्रत्येक रक्तदात्यास अंकुर सिड्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर यांच्या वतीने एक स्कूल बँग भेट स्वरूपात देण्यात आली.

या शिबिरा प्रसंगी संजय लोळगे , विद्या जोशी , ओंकार काळे, ज्ञानेश्वर झाबंरे, भाग्यश्री आंधळे, वैष्णवी देसाई, अंकुर सिड्स प्रा. लि. नागपूर चे मुळे यांसह स्वयंभु युवा प्रतिष्ठाणचे पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button