स्वारगेट बसस्थानकात चार वर्षाच्या मुलीचे अपहरण व सासवड मध्ये सुटका

मुलीच्या शोधासाठी गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांचे दहा पथके
महासंदेश : स्वारगेट बस स्थानक परिसरात आईसोबत झोपलेल्या एका चार वर्षाच्या मुलीचे गुरूवारी मध्यरात्री अपहरण झाले होते. मुलीच्या आईने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ तिचे फोटो आणि माहिती व्हॉट्सवरून व्हायरल करण्यात आले. त्यामुळे एका तरुणाला फोटोत दिसणारी मुलगी सासवड पीएमपी बस स्थानकात एका व्यक्तीसोबत दिसली. याबाबत याबात सासवड पोलिसांना कळविल्यानंतर मुलीची सुटका करून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.
मुलीच्या शोधासाठी गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची दहा पथके रवाना करण्यात आली होती. याबाबत सासवड पोलिसांनी संशयित आरोपी विलास कांबळे (रा.परभणी) याला ताब्यात घेतले. कांबळे व त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने पैशासाठी विक्री करण्याच्या हेतूने मुलीचे अपहरण केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त रविंद्र शिसवे , पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सागर पाटील,
.पोलीस आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त
चंद्रकांत सांगळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक
सोमनाथ जाधव, मसपोनि शेख, सपोनि जमदाडे, सपोनि रसाळ, त्र्यंबके, आदलिंग, पोलीसा उपनिरीक्षक मोरे, लोहोटे व स्वारगेट पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस हवालदार कुंभार, .बडे, .बोखारे, मनोज भोकरे, .ढावरे, साळवे,.कांबळे, उंडे, .शितकाल,. दळवी, घोडके, .पाटील,.मुढे यांच्या पथकाने केले.