अहमदनगर

स्विफ्टच्या धडकेत आजोबासह नातवाचा मृत्यू तरआजी गंभीर

अहमदनगर : शेवगावहून भातकडुगाव फाट्याकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या स्विफ्ट कारने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात एका सहा वर्षाच्या मुलासह त्याच्या आजोबाचा मृत्यू झाला. तर आजी गंभीर जखमी झाली. हा अपघात शेवगाव- नेवासा मार्गावरील दत्तपाटी येथे घडला.
अपघातात मयत झालेल्या आजोबाचे नाव दुर्योधन भालचंद्र आरगडे (वय ५३, रा. सौंदाळा, ता. नेवासा) असे असून नातवाचे नाव प्रथमेश प्रमोद आरगडे (वय ६, रा. सौदाळा) असे आहे. तर या अपघातात जखमी झालेल्या आजीचे नाव मिनाबाई दुर्योधन आरगडे (वय ४८) असे आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील दुर्योधन भालचंद्र आरगडे (वय ५३) हे शुक्रवार दि. २३ रोजी आपला नातू व पत्नीसह शेवगाव तालुक्यातील वरुर येथे आपल्या मुलीला भेटण्यासाठी आले होते. मुलीला भेटून ते दुपारी शेवगाव – नेवासा रोडने आपल्या सौंदाळा गावी दुचाकीवरून चालले होते. दरम्यान सायंकाळी  ते भातकुडगाव लगत असलेल्या दत्तपाटी येथून चालले असतांना समोरुन येणाऱ्या स्विफ्ट कारने समोरून धडक दिली. अपघात घडल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. जखमींना तातडीने शेवगाव येथील नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तत्पुर्वी प्रथमेश प्रमोद आरगडे (वय ६ वर्षे) याचा मृत्यू झाला. तर पुढील उपचारासाठी दुर्योधन आरगडे व पत्नी मिनाबाई आरगडे यांना नगर येथे घेऊन जातांना वाटेत दुर्योधन आरगडे (वय ५३) यांचा मृत्यू झाला. तर जखमी मिनाबाई आरगडे यांच्यावर विळद घाटातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Back to top button