अहमदनगरमहाराष्ट्र

हनीट्रॅप मधील आरोपींना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी

अहमदनगर : क्लासवन अधिकार्‍यावर हनीट्रॅप करणार्‍या जखणगावच्या तरूणीसह तिचा पंटर अमोल सुरेश मोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बागायतदारावर हनीट्रॅप करणार्‍या तरूणीसह मोरेवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ते न्यायालयीन कोठडीत होते. कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून त्यांना दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग करून घेतले आहे.

नगर तालुक्यातील एका बागतदाराला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडे खंडणी मागणी केल्या प्रकरणी जखणगावच्या तरूणीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे. त्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. नगर शहरातील एका क्लासवन अधिकार्‍याला घरी बोलावून त्याच्या सोबत नाजूक संबंध ठेवत त्याचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले होते. यानंतर सदर तरूणी व तिच्या पंटरांनी अधिकार्‍याकडे तीन कोटीची खंडणी मागितली होती. त्यामधील 80 हजार रूपये त्या अधिकार्‍याने दिले होते. या प्रकरणी अधिकार्‍याने पुढे येत पोलिसांत फिर्याद दिली. यात संबंधीत तरूणीसह तिचे पंटर अमोल मोरे, सचिन खेसे, महेश बागले, सागर खरमाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तरूणीसह मोरे याला पोलिसांनी वर्ग करून घेतले आहे. तर बागले पोलीस कोठडीत आहे. सचिन खेसे न्यायालयीन कोठडीत असून सागर खरमाळे पसार आहे.

Back to top button