अहमदनगर

हुतात्मा चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी : रामचंद्र दरे

महासंदेश : न्यू आर्ट्स, कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने क्रांतिदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी हुतात्मा चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास आणि समाधीस अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्रजी दरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
क्रांतिदिनाच्या निमित्ताने त्यांनी हुतात्मा चौथ्या शिवाजी महाराजांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी असून त्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली, तसेच क्रांतिवीरांच्या राष्ट्रीय योगदानाविषयी भूमिका विषद केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एच. झावरे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. अरुण पंदरकर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर यांनीही हुतात्मा चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश निमसे, प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, प्रा. डॉ. सुनिता मोटे, प्रा. भगवान कुंभार यांनीही समाधीला पुष्पार्पण करून अभिवादन केले तसेच प्रातिनिधिक स्वरुपात काही रासेयो स्वयंसेवकांनीसुद्धा समाधीला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करून सक्रीय सहभाग घेतला. स्वयंसेवकांनी श्रमदान करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Back to top button