अहमदनगर

हे काय भलतंच… ‘कंटेनमेंट झोन’मधील गावात ‘तोबा गर्दी’

अहमदनगर : एकीकडे सरकार कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगत आहे. मात्र दुसरीकडे कंटेनमेंट झोन’ असलेल्या गावात रेशन दुकानावर उसळलेली ‘तोबा गर्दी’ पाहता, उद्या जर कोरोनाचा जर प्रादुर्भाव वाढला तर त्याला जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील वडगांव ग्रामपंचायत कंटेनमेंट झोन घोषीत
केले आहे. मात्र असे असतांना देखील रेशन धान्य दुकानासमोर नागरिकांची प्रचंड गर्दी
झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोरोनाच्या दुसऱ्या
लाटेमुळे वडगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. दिवसेंदिवस
वाढत जाणाऱ्या संख्येमुळे तहसील प्रशासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्र
म्हणुन घोषीत केले. अत्यावश्यक सेवा  बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु रेशन धान्य दुकान अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे गावामध्ये धान्य वाटप करण्यात आले. स्थानिक पातळीवर कसलेच नियोजन न केल्यामुळे रेशन धान्य
दुकानासमोर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन, ना लोकप्रतिनिधी जबाबदारी घेत नाहीत. त्यामुळे पुढील काळात गावामध्ये जर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्या शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button