अहमदनगरमहाराष्ट्र

हे तर पळपुटे मंत्री ..!

भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका

महासंदेश : जोरदार पावसाने आणि महापुराने रत्नागिरीसह अनेक भागात हाहाकार उडाला आहे. एक क्षणात होत्याचे नव्हते झाले. एकीकडे जनता मोठ्या नैसर्गिक संकटात सापडले आहेत.  ते अन्न पाण्यावाचून तडफडत आहेत. अशा कठीण काळात पालकमंत्र्यांनी तिथे थांबून जनतेला मदत करायला हवी. पण पालकमंत्री मुंबईला पळ काढतात. हे पालकमंत्री नाही तर हे पळपुटे मंत्री आहेत, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.

आस्मानी संकटामुळे चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडत आहेत.  एवढच नाही तर पुरामुळे दवाखान्यात ॲाक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने एकाच दिवशी ८ रूग्ण दगावले अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात… अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळकुटे मंत्री..!!, अशी टीका चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर केली आहे.कोकणात पावसाने अक्षरश: हैदोस माजवलाय. अनेक ठिकाणी पूर आलाय. गावच्या-गावं पुराच्या पाण्यात अडकलीत… अशावेळी पालकमंत्र्यानी तिथे थांबून जनतेला धीर देणे अपेक्षित होते. मंत्री परब यांनी संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवली आहे. 

Back to top button