अहमदनगर

हॉटेल मालकाला गंडवणारे ‘ते’ तोतया अधिकारी जेरबंद

अहमदनगर : आम्ही उत्पादन शुल्कचे अधिकारी आहोत. तुमच्या हॉटेलची तपासणी करायची आहे. असा बहाणा करून तीन तोतया अधिकाऱ्यांनी २५ हजार रुपये लुटून पलायन केले. त्यामुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली. ही घटना संगमनेर तालुक्यातील शिबलापूर- संगमनेर रस्त्यावर असलेल्या शेडगाव शिवारातील हॉटेल न्यू कॉर्नर येथे घडली. मात्र अवघ्या काही तासात पोलिसांनी दोघा आरोपींना जेरबंद केले आहे.

याबाबत सविस्तर असे की, शुक्रवारी सायंकाळी हॉटेलचे मालक सुनिल फड व त्यांचा भाऊ अनिल हे  हॉटेलसमोरील अंगणात बसले होते. त्यावेळी तेथे महिंद्रा एसयूव्ही (एमएच १५ जीआर ६८८७) ही गाडी आली. त्या गाडीतून आलेल्या तिघांनी आम्ही उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याचे सांगून तुमचे हॉटेल उघडा, आम्हाला रेकॉर्ड चेक करायचे असल्याचे म्हणाले. हॉटेल उघडल्यानंतर हॉटेल का उघडलेस असे त्यांच्यातील एकजण म्हणाला. हॉटेल बंद असून तुम्ही उघडा म्हटल्याने मी उघडले, असे सांगितल्यानंतर दुसऱ्याने लॉकडाऊनमध्ये हॉटेल चालू असल्याने परमिट रद्द करण्याची धमकी दिली. असे करू नका म्हणताच त्या व्यक्तीने मला बाजूला घेऊन २५ हजार रुपयाची मागणी केली.
त्यांनी त्या व्यक्तीच्या हातात दिले.  पैसे घेऊन ते घाईघाईने जात असल्यामुळे त्याचा संशय आल्याने त्यांना थांबण्यास सांगितले; परंतु ते गाडीत बसून निघुन गेले. दरम्यान फड यांनी दुचाकीवरुन त्यांचा पाठलाग केला. पण भरधाव वेगाने निघून गेले.

Back to top button