Travelअहमदनगरमहाराष्ट्र

७० लाखांचे चंदन जप्त

केरळची चंदन तस्कराची टोळी जेरबंद
: संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई  

अहमदनगर :  केरळ येथील चंदन तस्करांची टोळी तब्बल ७१ लाखंाच्या चंदनाच्या लाकडासह पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हे चंदन ते मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूर येथे घेवून जात होते. ही कारवाई श्रीरामपूर विभागाचे पोलिस अपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने केली. याप्रकरणी अब्दुल मोहम्मद निसाद (वय ३२ रा.अंजामैल हाऊस  ता.बैदाडका. जिकासारगुड, केरळ) अब्दुल फक्रुद्दीन रहमान (वय ४१ रा.अमितकला हाऊस ता.ऐनमाकजा जि.कासारगुड केरळ)  या दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर असे की,केरळ राज्यातील चंदन तस्करांची टोळी राहुरी हद्दीतून मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूर येथे चोरीचे चंदन घेऊन  जाणार असल्याची माहिती श्रीरामपूर विभागाचे पोलिस अपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदाराने दिली. त्यानुसार मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी राहुरी कारखाना येथे सापळा लावला. संशयित वाहन येताच पोलिसांनी अडवून त्याची झडती घतली असता ६१ लाख रुपये किमतीचे (६५०किलो) चंदन  आणि १० लाखाचे वाहन असा एकूण ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी  अब्दुल मोहम्मद निसाद, अब्दुल फक्रुद्दीन रहमान या दांघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
 ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक मधुकर शिंदे,  पोलिस निरीक्षक निलेश कुमार वाघ, स. फौ.राजेंद्र आरोळे, पो.हे.कॉ.सुरेश  औटी,  पो.ना.जानकीराम खेमनर, पो. कॉ. गणेश फाटक, किशोर जाधव, सुनील दिघे, राहुल नरोडे, होमगार्ड तुषार बोराडे, रमेश मकासरे आदींनी केली.

Back to top button