अहमदनगर

९६ वर्षाचा मूक साक्षीदार कोसळला !

अहमदनगर : जसे नगरला ऐतिहासिक महत्व आहे. तसेच या ठिकाणी अनेक अत्यंत जुन्या काळातील काही इमारती आहेत. काळाच्या ओघात काही नामशेष झाल्या तर काही अखेरच्या घटका मोजत आहेत. या इमारतीचे वय संपले असल्याने त्या कधीही कोसळू शकतात. अशीच घटना माणिक चौक येथे घडली आहे

गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह धुवॉंधार कोसळल्या पावसाने माणिक चौक येथील ९६ वर्षीय जुन्या इमारतीचा एक भाग कोसळला. त्यामुळे इमारतीलगत असलेल्या दोन दुकांनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात कोणतीही जीवितहनी झाली नाही मात्र वित्तहानी झाली आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या दोन दिवसापासून नगर शहरात पावसाची बॅटिंग सुरू आहे. काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसाने शहर व परिसराला अक्षरश झोडपून काढले. नगर शहरातील चितळे रोड, माळीवाडा, दिल्लीगेट, कापडबाजर, सावेडी, पाईपलाईन रोड, सावेडी, भिगार, केडगाव भागात पावसाच्या चांगल्याच सरी बरसला. या पावसामुळे धोकादायक इमारतीचा प्रश्न चागलाच ऐरणीवर आला आहे.

Back to top button