अहमदनगरमहाराष्ट्र

2021 चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याची कार्यवाही करावी

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी
शिक्षण मंत्रींना निवेदन
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यास शिक्षक परिषद आग्रही -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर होत असताना यावर्षी 2021 चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याची कार्यवाही सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर व कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे. मागील वर्षी 2020 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करुन ते प्रदान केले. मात्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. मात्र यावर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याची कोणतीही कार्यवाही सुरु करण्यात आलेली नसून, सदर पुरस्कार जाहीर करण्याची मागणी शिक्षक परिषदेने लाऊन धरली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
मागील वर्षी केंद्र सरकारने राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार विजेत्यांची निवड करुन त्यांना पुरस्कार प्रदान केलेले आहेत. यावर्षीही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रायलाकडून आवेदन पत्रे मागवण्यात आलेली आहेत. यासंदर्भात राज्याच्या शिक्षण संचालकांनी 1 जून रोजी माहिती करीता, प्रसिद्धीकरिता एक पत्रही निर्गमित केलेले आहे. मात्र राज्य सरकार राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यास पुढाकार घेत नसल्याने ही खेदाची गोष्ट असून, शिक्षकांच्या कार्याची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल काकर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, महादेव देवकर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, प्रविण उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरूडे, युनूस शेख आदी प्रयत्नशील आहेत.

Back to top button