पंतप्रधान सूर्य घर: मोफत वीज योजना 2024 | मोफत सोलर पॅनेल | PM Surya Ghar Muft Bijli Yojana

PM Surya Ghar Muft Bijli Yojana (पंतप्रधान सूर्य घर: मोफत वीज योजना 2024): पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना: भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत वीज उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे. सर्वसामान्य लोकांना वाढती वीज बिले स्वस्त करण्यासाठी तसेच नागरिकांचे 300 युनिट मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी भारत देशातील केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून लोकांना त्यांच्या घरी सोलर पॅनेल बांधण्यासाठी सबसिडी देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ संपूर्ण भारतातील एक कोटी कुटुंबीयांना होणार आहे, तसेच सरकारची पण लाखो रुपयांची बचत होईल. या योजनेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल ती म्हणजे मोफत सोलर पॅनल उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज बिल योजना सुरू करण्यात आली आहे . या योजनेची संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

 

पंतप्रधान सूर्य घर: मोफत वीज योजना 2024 तपशील:

तपशील योजनेचा तपशील
योजनेचे नाव पंतप्रधान सूर्य घर: मोफत वीज योजना
योजनेचा उद्देश्य मोफत वीज प्रदान करणे.
लाभार्थी भारत देशातील सर्वसामान्य नागरिक
लाभ 300 युनिट मोफत वीज सोलर पॅनेल उपलब्ध
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

 

PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024

योजनेचा उद्देश:

  • योजनेचा मुख्य उद्देश असा की एक करोड कुटुंबीयांना 300 युनिट मोफत वीज प्रदान करणे
  • सर्वसामान्य लोकांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवणे व सबसिडी लागू करणे आहे.
  • घरातील वीज बिल चा खर्च कमी करणे आहे.
  • अक्षय ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात होण्याकरिता तसेच कार्बन डायॉक्साईड कमी करणे.

योजना लाभार्थी:

भारत देशातील सर्वसामान्य नागरिक

योजनेचे फायदे:

Average Monthly Electricity Consumption (units) Suitable Rooftop Solar Plant Capacity Subsidy Support
0-150 1-2 kW ₹ 30,000/- to ₹ 60,000/-
150-300 2-3 kW ₹ 60,000/- to ₹ 78,000/-
> 300 Above 3 kW ₹ 78,000/-
  • घरांमध्ये मोफत वीजपुरवठा.
  • सरकारच्या वीजखर्चात घट.
  • नवीकरणीय ऊर्जेचा वाढता वापर.
  • कार्बन उत्सर्जनात कमी.

योजना पात्रता:

  • अर्जदार कुटुंबीय भारतीय देशाचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
  • सोलर पॅनेल बसण्याकरिता उमेदवाराकडे योग्य घरावरती छप्पर असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीच्या घरामध्ये वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
  • सर्वसामान्य जातीच्या लोकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

पंतप्रधान सूर्य घर: मोफत वीज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • वीज बिल
  • बँक पासबुक
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला
  • छप्पर मालकीचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024

अर्ज प्रक्रिया कशी आहे?

  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट pmsuryaghar.gov.in वर भेट द्या.
  • तुमच्यासमोर होम पेज ओपन होणार पुढे नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन करून तुमचे राज्य निवडा , वीज वितरण कंपनी निवडा ,वीज ग्राहक क्रमांक टाका, मोबाईल नंबर टाका, ईमेल प्रविष्ट करा ,कृपया पोर्टलच्या निर्देशानुसार पालन करा.
  • ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन बटनावरती क्लिक करा.
  • फॉर्मनुसार रूफटॉप सोलर साठी ऑनलाइन अर्ज करा
  • डिस्काॅम व्यवहार्यता मंजुरीसाठी प्रतीक्षा करा. जेव्हा तुम्हाला व्यवहार्यता मान्यता मिळाल्यावर तुमच्या डिस्कॉम मधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करा.
  • तुमचे इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर प्लांट तपशील जमा करून ,नेट मीटर साठी अर्ज करा.
  • नेट मीटर स्थानिक झाल्यानंतर आणि डिस्काॅमद्वारे निरीक्षण केल्यानंतर ,पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.
  • तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर प्रोटेल द्वारे बँक खात्याचे वितरण करा आणि एक चेक रद्द करा. तुम्हाला तीस दिवसांच्या आत सबसिडी तुमच्या बँक खात्यात मिळेल.

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न(Frequently Asked Questions- FAQ)

1.अर्जदाराने जर आपले निवासस्थान किंवा कार्यालय, जिथे RTS बसवले आहे, बदलले, तर RTS चे काय होईल ?

उत्तर: RTS सिस्टम सहजपणे उखडून दुसऱ्या ठिकाणी पुन्हा बसवता येऊ शकते, त्यामुळे नवीन ठिकाणी हलविण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

2. भाड्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला सोलर रूफटॉप सिस्टम बसवता येईल का?

उत्तर: होय, रूफटॉप सोलर सिस्टम बसवण्यासाठी घरमालकाची परवानगी आणि आपल्याच नावावर वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. तसेच, वीजबिल नियमितपणे स्वतःच्याच नावाने भरले पाहिजे. या अटी पूर्ण झाल्यास, तुम्ही सोलर रूफटॉप सिस्टम बसवू शकता.

3. योजना कशाबद्दल आहे?

उत्तर: ही भारतातील घरांना मोफत वीज पुरवण्यासाठी सरकारची एक योजना आहे.

 

This page provides comprehensive details about pm surya ghar muft bijli yojana, pm surya ghar yojana apply online, qrt pm surya ghar, pm surya ghar yojana online apply, pm surya ghar gov in, pm surya ghar yojana gov in, pm surya ghar gov in apply online, pm surya ghar online apply, pm surya ghar yojana registration, pm surya ghar muft bijli yojana apply online, पंतप्रधान सूर्य घर: मोफत वीज योजना 2024. For the latest recruitment updates, keep visiting mahasandesh website.

 

Leave a Comment