Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana 2024 | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना 2024 | CMEGP

Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana 2024 (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना 2024) आज कालच्या सर्वच तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते परंतु भांडवलाच्या अभावामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तसेच समाजात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही फार वाढलेली आहे म्हणून जे तरुण व होतकरू तरुण आहेत त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यातून बेरोजगार लोकांना रोजगार मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील सर्व तरुणांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू केली आहे.

राज्यातील बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना म्हणजे एक मोठी संधी आहे. विविध शहरांमध्ये आयोजित कार्यक्रमांमधून तरुणांना व्यवसाय सुरू करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या लेखामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, आणि योजनेच्या अटी याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. या स्पर्धेच्या युगात, नोकरी मिळणे कठीण झाल्यामुळे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ही योजना खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे, जास्तीत जास्त बेरोजगार नागरिकांना रोजगार मिळेल आणि ते आपल्या जीवनात यशस्वी होतील. म्हणून संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा आणि अशा प्रकारचा शासकीय योजना, शेतकरी योजना आणि शासकीय नोकरीच्या अधिसूचनांसाठी खाली दिलेल्या आमच्या सामाजिक प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला फॉलो करा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा
Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana 2024
Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana 2024

Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana 2024 (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना) काय आहे?

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना(Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana), ज्याला CMEGP महाराष्ट्र असेही म्हणतात, महाराष्ट्र सरकारने राज्यातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत, राज्यातील बेरोजगार तरुणांना 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते, ज्यामुळे ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना तपशील
तपशील योजनेचा तपशील
योजनेचे नाव मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना
योजनेचा उद्देश्य तरुणांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्यासाठी
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील युवक
लाभ व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची उद्दिष्टे:

  • महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना स्वयंरोजगार तयार करून जास्तीत जास्त रोजगार मिळवून देणे आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील विविध शहरी आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी करणे आहे.
  • महिलांना 30 टक्के आरक्षण देऊन स्वयंरोजगार होण्यासाठी प्रेरित करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील उद्योगांना चालना मिळणे.
  • नागरिकांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचे वर्गीकरण:

अर्जदार प्रवर्ग स्वतःची गुंतवणूक शासकीय अनुदान बँक कर्ज
अर्जदाराचा प्रभाग ➡️ शहरी ग्रामीण शहरी ग्रामीण
अनुसूचित जाती / जमाती / महिला / अपंग  व माजी सैनिक ५ % २५ % ३५ % ७० % ६० %
उर्वरित प्रवर्ग १० % १५ % २५ % ७५ % ६५ %

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना पात्रता:

  • रहिवासी: अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • वय: किमान वय 18 वर्षे असावे.
  • लाभास योग्य: ज्या अर्जदाराने यापूर्वी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेसारख्या राज्य सरकारचा कोणत्याही स्वयंरोजगार योजने अंतर्गत राज्य सरकारकडून अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • डोमिसाईल प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • कौशल्य विकास प्रशिक्षण किंवा REDP, EDP किंवा SDP प्रशिक्षण घेतले असल्याचे प्रमाणपत्र
  • अपंग प्रमाणपत्र (अपंग असल्यास)
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • शपथपत्र / हमीपत्र / प्रतिज्ञापत्र
  • अर्जदार सुरु करण्यास इच्छुक असलेल्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना 2024 नोंदणी प्रक्रिया:

  • सर्वप्रथम तुम्हाला Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana (CMEGP) अर्थात महाराष्ट्र सरकारच्या उद्योग संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.(अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा)
  • Online Application For Individual Applicant किंवा Application For Non-Individual Applicant यातील योग्य पर्याय तुमचा आवश्यकतेनुसार निवडा
  • या नंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती योग्य पद्धतीने भरा आणि तेथे विचरलीगेलेली आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • आता सबमिट किंवा सेव्ह बटणावर क्लिक करा.
  • अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न(Frequently Asked Questions- FAQ)

1.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे लाभार्थी कोण असतील?

उत्तर: महाराष्ट्र राज्यातील तरुण नागरिक

2. मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची मर्यादा किती आहे?

उत्तर: या योजनेचा लाभ 18 ते 45 वयोगटातील महाराष्ट्रातील व्यक्ती घेऊ शकतात. अनुसूचित जाती, जमाती, महिला, माजी सैनिक या विशेष श्रेणीसाठी वय मर्यादा ५ वर्षांनी शिथिल आहे.

3. आधीचा व्यवसाय चालू असताना मी मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजनेचा लाभ घेऊ शकतो का?

उत्तर: नाही. आधीचा व्यवसाय चालू असताना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

4. मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजनेचा अधिकृत संकेत स्थळ कोणते आहे?

उत्तर: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना(Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana) CMEGP चा अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्त्वाची माहिती – Mahasandesh

दैनिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी रोज https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.

प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,

आम्ही तुमच्यासाठी रोजच्या महत्त्वाच्या बातम्यांची माहिती देणारा एक ब्लॉग तयार केला आहे. सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

Leave a Comment