Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 (मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024) ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे कृषी पंप उपलब्ध करून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांना वीज खर्च कमी होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर पर्यावरणालाही फायदा होतो. त्या योजनेसाठी लागणाऱ्या नियम अटी कोणत्या आहेत, कोण लाभार्थी होऊ शकतात, अर्ज कसा भरायचा आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबद्दलची माहिती या लेखात जाणून घेऊया.
दिवसेंदिवस तंत्रज्ञान विकसित होत आहे. परंतु तरीसुद्धा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या शेतीविषयक समस्यांना सामोरे जावे लागते त्यातीलच एक समस्या म्हणजे योग्य वेळेला वीज पुरवठा नसणे. आजही महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांसाठी अखंडित वीज पुरवठ्याची उपलब्धता नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी पाण्याचा उपसा करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य वेळेत शेती पिकांना मुबलक प्रमाणात पाणी न मिळाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. म्हणून महाराष्ट्र राज्यात ‘अटल’ सौर कृषीपंप योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत, राज्य शासनाने ३ वर्षांत १ लाख सौर कृषीपंप टप्याटप्याने बसवण्याचे नियोजन केले आहे.
पहिल्या टप्प्यात २५,००० पंप,
दुसऱ्या टप्प्यात ५०,००० पंप आणि
तिसऱ्या टप्प्यात २५,००० पंप बसवले जातील.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सौर पंप दिले जातात, ज्यामुळे ते आपल्या शेतीसाठी आवश्यक असलेली पाणीपुरवठा सहज आणि स्वस्तात करू शकतात. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होऊन शेती अधिक फायद्याची होईल.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 तपशील:
तपशील | योजनेचा तपशील |
योजनेचे नाव | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना |
योजनेचा उद्देश्य | शेतकऱ्यांना सिंचनाकरिता सौर कृषी पंप विकत घेण्याकरिता अनुदान उपलब्ध करून शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
लाभ | 95 टक्के अनुदान उपलब्ध करून देणे |
अधिक माहितीसाठी |
येथे क्लिक करा |
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024
योजनेचा उद्देश:
- शेती पिकांसाठी शेतकऱ्याला पाण्याचा उपसा करण्याकरिता 95 टक्के अनुदान उपलब्ध करून आर्थिक सहाय्य व सामाजिक विकास करणे
- शेतकऱ्याला पाण्याचा उपसा करण्याकरिता अखंडित वीज पुरवठा मिळवून देणे
- शेतकऱ्यांना सशक्त करणे
- शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे
योजना सारांश:
मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजने अंतर्गत, राज्य शासनाने ३ वर्षांत १ लाख सौर कृषीपंप टप्याटप्याने बसवण्याचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना सिंचनाकरिता सौर कृषी पंप विकत घेण्याकरिता 95 टक्के अनुदान उपलब्ध करून देणे.
योजना लाभार्थी:
महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील शेतकरी
योजना फायदे:
- दिवसाच्या वेळेत शेतीपंपांना वीज उपलब्धता.
- दिवसा अखंडित वीज पुरवठा.
- वीज बिलापासून मुक्तता.
- डिझेल पंपांच्या तुलनेत शून्य परिचालन खर्च.
- पर्यावरणपूरक परिचालन.
- शेती सिंचनासाठी वीज सबसिडीपासून वेगळे करणे.
- औद्योगिक, वाणिज्यिक, व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रॉस सबसिडीचा भार कमी करणे.
सौर कृषी पंपाचा टप्यांचे नियोजन:
- पहिल्या टप्प्यामध्ये – 25000 सौर कृषी पंप
- दुसऱ्या टप्प्यामध्ये – 50000 सौर कृषी पंप
- तिसरा टप्प्यामध्ये – 25000 सौर कृषी पंप
योजना पात्रता:
1. लाभार्थी निवडीचे पात्रता निकष – (३ व ५ अश्वशक्ती )-
- शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत असलेली जमीन असावी.
- पारंपरिक पद्धतीने विद्युत जोडणी न मिळालेले शेतकरी.
- ५ एकरपर्यंतच्या जमिनीवर ३ अश्वशक्तीचे सौर कृषीपंप, आणि ५ एकरापेक्षा जास्त जमिनीवर ५ आणि ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषीपंप मिळतील.
- लाभार्थी शेतकऱ्याने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य.
- वन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्युत जोडणी न झालेल्या गावातील शेतकरी.
- “धडक सिंचन योजना” अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
- महावितरणकडे पैसे भरून प्रलंबित असलेले अर्जदार शेतकरी.
2. लाभार्थी निवडीचे पात्रता निकष ७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप करिता-
- विहिर किंवा कूपनलीका असणे आवश्यक आहे.
- अद्यावत भूजल अहवालानुसार, अतिशोषित आणि अंशत: शोषीत क्षेत्रातील विहीरींमध्ये आणि कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देण्याची परवानगी नाही.
- सुरक्षीत पाणालोट क्षेत्रात उपशाची स्थिती ६० टक्के पेक्षा कमी असेल, तर तेथे नवीन सौर पंप दिले जाऊ शकतात.
- खडकाच्या क्षेत्रातील विंधन विहीरी शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे त्यात सौर पंप बसवण्याची परवानगी नाही. मात्र, गाळाच्या क्षेत्रातील कूपनलीकांमध्ये, नवीन सौर पंप देण्याची परवानगी आहे.
- ६० मीटर पेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये किंवा कूपनलिकांमध्ये सौर पंप बसवण्याची परवानगी नाही.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 योजना वर्गवारी निहाय लाभार्थी हिस्सा:
वर्गवारी | लाभार्थी हिस्सा | ३ एचपी लाभार्थी हिस्सा | ५ एचपी लाभार्थी हिस्सा | ७.५ एचपी लाभार्थी हिस्सा |
---|---|---|---|---|
सर्वसाधारण | १०% | रु. १६५६०/- | रु. २४७१०/- | रु. ३३४५५/- |
अनुसुचित जाती | ५% | रु. ८२८०/- | रु. १२३५५/- | रु. १६७२८/- |
अनुसुचित जमाती | ५% | रु. ८२८०/- | रु. १२३५५/- | रु. १६७२८/- |
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 च्या लाभासाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
1. लाभार्थीचे आधार कार्ड
2. रेशनकार्ड
3. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी किंवा अधिवास प्रमाणपत्र
4. मोबाईल नंबर
5. बँक खाते पासबुकच्या पानाची प्रत
6. पासपोर्ट आकाराचा फोटो
7. रेशनकार्ड
8. जमिनीचा सातबारा उतारा, 8अ आणि शपथपत्र
अर्ज प्रक्रिया
महावितरणचा वेब पोर्टल वर https://www.mahadiscom.in/solar ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न(Frequently Asked Questions- FAQ)
1.मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी कोण असतील?
उत्तर: महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
2. योजनेचे कसे केले जातील ?
उत्तर:
पहिल्या टप्प्यात २५,००० पंप,
दुसऱ्या टप्प्यात ५०,००० पंप आणि
तिसऱ्या टप्प्यात २५,००० पंप
3. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना म्हणजे काय?
उत्तर: ३ वर्षांत १ लाख सौर कृषीपंप टप्याटप्याने बसवणे आणि शेतकऱ्यांना सौर कृषी पंप विकत घेण्याकरिता 95 टक्के अनुदान देणे.
महत्त्वाची माहिती (mahasandesh)
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |