अहमदनगर
Trending

कांद्याला योग्य भाव मिळणार का?

कांद्याला योग्य भाव मिळणार का?
शेतकर्‍याच्या चिंतेत वाढ ;कांद्याची आवक वाढली
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती पुढे वाहनांच्या लागल्या रांगा

नगर, दि.30- गेल्या वर्षी लाल कांद्याला मोठ्या प्रमाणात भाव मिळाल्याने शेतकर्‍यांनी उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. त्याला वातवरणही अनुकल असल्यानेे कांद्याचे उत्पन्नही चांगल्या प्रकारे मिळाले. मात्र, ऐनवेळी भावाची घसरण झाल्याने शेतकर्‍यांनी कांद्याची साठवणूक केली. करोना माहामारीचे संकटात लॉकडाऊन वाढल्याने शेतकर्‍यांसह सर्वच होरपळून निघाले. त्यात कांदा नाशवंत असल्याने टिकवनेही मुश्कील झाल्याने शेतकरी कांदा विक्री करण्यासाठी बाहेर काढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजार समित्यामध्ये आवक होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ होत असून योग्य भाव मिळतो की नाही असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
नुकतीच राहुरी बाजार समिती समोरील नगर-मनमाड महामार्गावर शेतकर्‍यांच्या कांद्याच्या वाहनांची दीड किलोमीटर रांग लागली होती. शुक्रवारी रोजी बाजार समितीत कांद्याचा लिलाव होणार असल्याने शेतकर्‍यांनी आज कांदा गोण्यां बाजार समितीत दाखल केल्या. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ वाहन चालक व शेतकर्‍यांना सॅनीटायझर देवून, थर्मल गनद्वारे शरीराचे तापमान मोजण्यात येत असून, त्यांची नोंद रजिस्टरला ठेवण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची रांगा लागल्या असल्याचे वाहन चालकांकडून सांगण्यात आले.
भाव वाढतील या अपेक्षेने शेतकर्‍यांनी कांदा चाळीत भरला होता परंतु, सततच्या पावसामुळे चाळीतील कांदा सडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकर्‍यांनी चाळी फोडून कांदा बाजारात नेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कांद्याची आवक वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags
Back to top button