West Indies vs Afghanistan (T20 World Cup 2024)च्या अंतिम साखळी सामन्यात वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचा 104 धावांच्या मोठ्या फरकाने दारुण पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
वेस्ट इंडिजने या साखळी सामन्यातील चारीही सामने जिंकुन विजयरथ कायम ठेवला. हा सामना लुसिया येथील सॅमी आंतरराष्ट्रीय स्टेडियम वर झाला.
West Indies vs Afghanistan (T20 World Cup 2024)
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. हि धावसंख्या या विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 16.2 षटकांत 114 धावा करून ऑलआऊट झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील धावांच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा हा आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा विजय आहे.
![West Indies vs Afghanistan](https://mahasandesh.com/wp-content/uploads/2024/06/Screenshot-2024-06-18-173901.png)
वेस्ट इंडिजकडून निकोलस पुरणने 53 चेंडूत 98 धावा काढल्या. तर जॉन्सन चार्ल्सने 43 आणि रोव्हमन पॉवेलने 26 धावा केल्या. तर अफगाणिस्तानचा संघाकडून इब्राहिम झादरानने सर्वाधिक 38 धावा केल्या.
वेस्ट इंडिजकडून औबेड मॅकॉयने ३ बळी घेतले आणि गुडाकेश मोती आणि अकिल हाऊसेनने 2-2 तर आंद्रे रसेल आणि अल्झारी जोसेफने 1-1 बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानचा संघाचा कर्णधार म्हणजेच रशीद खान यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला परिणामी अफगाणिस्तानला स्पर्धेतील पहिला पराभव स्वीकारावा लागला आणि वेस्ट इंडिज संघाने त्यांचा विजयरथ कायम ठेवला. या सामन्याचा सुपर-8 वर कोणताही परिणाम झाला नाही. अफगाणिस्तानचा संघाचे गोलंदाज पुरण वादळाला रोखू शकले नाही.
अफगाणिस्तानचा संघ –
राशिद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, गुलाबदीन नैब, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह झादरान, करीम जनत, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी.
वेस्ट इंडिजचा संघ –
रोवमन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन, शाई होप, शेरफन रूदरफोर्ड, आंद्रे रसेल, अकील हुसैन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, ओबेड मॅककॉ.
महत्त्वाची माहिती (mahasandesh)
दैनिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी रोज https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
आम्ही तुमच्यासाठी रोजच्या महत्त्वाच्या बातम्यांची माहिती देणारा एक ब्लॉग तयार केला आहे. सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
![]() |
येथे क्लिक करा |