CM Ladki Bahin Yojana 2024: उपमुख्यमंत्री अजितदादांनी तारीख सांगितली, हि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा सर्व लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. या योजनेत अर्ज करण्याची मुदत आधी 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेला महिलांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे या योजनेची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ती मुदत वाढवून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणीसाठी अनेक लोक विविध मागण्या मांडत आहेत. अशामध्ये या योजनेचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात कधी येणार याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा आणि अशा प्रकारचा शासकीय योजना, शेतकरी योजना आणि शासकीय नोकरीच्या अधिसूचनांसाठी खाली दिलेल्या आमच्या सामाजिक प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला फॉलो करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |
‘या’ दिवशी जमा होणार लाडकी बहीण योजनेचे पैसे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 15 जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी असल्याचे लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले आहेत, त्यांच्या अर्जांची तात्पुरती यादी 16 जुलैला प्रसिद्ध होईल, तर अंतिम यादी 1 ऑगस्टला जाहीर केली जाईल. त्यानंतर 14 ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल, आणि 15 ऑगस्टपर्यंत सर्व महिलांना रक्कम मिळेल. योजनेअंतर्गत ऑगस्टनंतर दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा केले जातील.
लाडकी बहीण योजने बाबत मोठी घोषणा नियम पुन्हा बदलले, फक्त बदललेले नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
CM Ladki Bahin Yojana 2024 (मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना)
लाडकी बहीण योजनेअंतर्गत, राज्य सरकारने 21 ते 65 वयोगटातील कमी उत्पन्न असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण कोण लाभार्थी पात्र होतील, अर्ज कसा भरायचा, आवश्यक कागदपत्रे या संधर्भात अधिक व सखोल माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सरकारने एक नवीन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिला लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करू शकतील. हे ॲप पात्र महिलांना योजना नोंदणी व लाभ मिळविण्यासाठी सोयीस्कर साधन आहे. महिलांना सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन अर्ज करण्याची गरज नाही, यासाठी सरकारने हे ॲप तयार केले आहे. हा ॲप महिलांना सोपी आणि सुलभ अर्ज प्रक्रिया प्रदान करतो.
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट App वरून | Mazi Ladki Bahin Yojana App | Narishakti Doot App 2024 जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न(Frequently Asked Questions- FAQ)
1.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कोण असतील?
उत्तर: विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
2. योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची मर्यादा किती आहे?
उत्तर: अर्जदाराचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे.
3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय?
उत्तर: राज्यातील सर्व महिला ज्यांचं वय 21 ते 65 या वयोगटामध्ये आहे त्या सर्व महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देणारी ही योजना आहे.
4. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती असावे?
उत्तर: वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असावे
5. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फायदे काय आहे ?
उत्तर: महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा रु. १,५००/- जमा केले जातील
महत्त्वाची माहिती (mahasandesh)
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |