PM Kisan Samman Nidhi Yojana 2024 | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना | प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना

PM Kisan Samman Nidhi Yojana (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना) योजना केंद्र सरकार गरजू आणि गरीब वर्गातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना एक आर्थिक साहाय्य म्हणून राबवते असते. महाराष्ट्र राज्यात या योजनेची सुरवात ०१/१२/२०१८ झाली आहे. या योजने मध्ये शेतकरी कुटुंबाला प्रति हप्ता २००० – २००० हजार असे तीन हप्ते म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.  सुरुवातीला या योजनेचा लाभ ज्या शेतकरी कुटुंबाकडे दोन हेक्टर पर्यंतची शेती आहे त्यांच्यासाठीच होता. या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सर्वच शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश दिले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेत केंद्र सरकारने निकष सैल केल्यामुळे लाभार्थी शेतकरी कुटुंबांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.

यापुढे आम्ही सांगणार आहोत की PM Kisan Samman Nidhi Yojana (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी) योजनेचा लाभ आपण कसे मिळवू शकतात. जर तुम्ही अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नसेल, तर आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती देऊ. या लेखामध्ये तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय, त्याचे उद्दिष्ट, पात्रता, आवश्यक कागदपत्रे इत्यादींची माहिती मिळेल. त्यामुळे कृपया हा लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा
PM Kisan Samman Nidhi Yojana 2024
PM Kisan Samman Nidhi Yojana 2024
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना तपशील
तपशील योजनेचा तपशील
योजनेचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजना
योजनेचा उद्देश्य गरजू आणि गरीब वर्गातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना एक आर्थिक साहाय्य मिळून देण्यासाठी
लाभार्थी भारतीय शेतकरी
लाभ ₹6000 प्रति वर्ष
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अधिकृत ॲप (Google Play Store)  येथे क्लिक करा

 

PM Kisan Samman Nidhi Yojana (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना) उद्देश:

पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू करण्यामागील केंद्र सरकारचे मुख्य उद्दिष्ट हे देशातील सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवने आणि त्यांना एक आर्थिक साहाय्य करणे आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे जिथे बहुतांश कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. अनेकदा शेतकऱ्यांना शेतीत नुकसान सहन करावे लागते आणि शेतीसंबंधित विविध समस्यांना आव्हान द्यावे लागते, हे आपण सर्वजण जाणतो. म्हणूनच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे की देशातील सर्व लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करण्यात यावी, त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना चांगली आजीविका मिळेल आणि शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर आणि सशक्त बनतील.

 

PM Kisan Samman Nidhi Yojana (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना) नोंदणी प्रक्रिया:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी प्रक्रिया खालील प्रमाणे आहे-

  1. सर्वप्रथम, अर्जदाराने योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. (अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा)
  2. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यावर, तुमच्यासमोर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची मुख्यपृष्ठ स्क्रीन उघडेल.
  3. या मुख्यपृष्ठावर “शेतकरी कॉर्नर”(Farmers Corner) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  4. या पर्यायात तुम्हाला आणखी तीन पर्याय दिसतील. त्यापैकी तुम्हाला “नवीन शेतकरी नोंदणी”(New Farmer Registration) या पर्यायावर क्लिक करावे.
  5. त्यावर क्लिक केल्यावर, नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म तुमच्यासमोर उघडेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर, प्रतिमा कोड भरावा लागेल आणि सर्व आवश्यक माहिती पूर्ण करावी लागेल.
  6. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  7. पुढे, नोंदणी फॉर्मची प्रिंट आउट घ्या आणि भविष्यासाठी जतन करा.

अशा प्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न(Frequently Asked Questions- FAQ)

1, पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही एक नवीन केंद्रीय योजना आहे, जी देशातील सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना उत्पन्न सहाय्य देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधित विविध गरजा आणि घरगुती आवश्यकतांसाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाईल.

2. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे फायदे काय आहे ?

या योजने मध्ये शेतकरी कुटुंबाला प्रति हप्ता २००० – २००० हजार असे तीन हप्ते म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.

3. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे अपात्र लाभार्थी कोणकोणते आहेत ?

i. जमीन धारण करणारी संस्था

ii. संवेधानिक पद धरण केलेली आजी माजी व्यक्ती

iii. आजी माजी सर्व मंत्री

iv. आजी माजी आमदार खासदार

v. आजी माजी महापौर जि. प.अध्यक्ष

vi. आयकर भरणारी व्यक्ती

vii.निवृत्ती वेतन १०००० पेक्षा जास्त घेणारी व्यक्ती

viii. नोंदणीकृत डॉक्टर वकील अभियंता

4. एका वर्षात किती वेळा योजनेचा लाभ घेता येईल?

PM-KISAN योजनेतर्गत, सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक लाभ घेता येईल. हा लाभ 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केला जाईल.

महत्त्वाची माहिती

दैनिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी रोज https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.

प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,

आम्ही तुमच्यासाठी रोजच्या महत्त्वाच्या बातम्यांची माहिती देणारा एक ब्लॉग तयार केला आहे. सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

Leave a Comment