भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासोबतचा दौरा | PM Modi meets Putin 2024 | Modi Meet Putin

PM Modi meets Putin 2024: भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासोबतचा दौरा:

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जूनमध्ये भारताचा पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच परदेश दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी मॉस्कोमध्ये भेट घेतली. हा दौरा त्यांच्या पाश्चिमात्य मित्र राष्ट्रांद्वारे बारकाईने पाहिला गेला आहे. माध्यमांचा मते नरेंद्र मोदींच्या मॉस्को आगमनाच्या काही तास अगोदरच रशियाने युक्रेनवर हल्ला करून किमान ४१ लोकांचा बळी घेतला, ज्यामध्ये काही मुलांचा समावेश होता. या घटनेमुळे जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

 

Modi Meet Putin
Modi Meet Putin

PM Modi meets Putin 2024

मॉस्कोमध्ये नरेंद्र मोदीजी आणि पुतिन यांची हसत-खेळत भेट झाली. या भेटी दरम्यान पुतिन यांनी मोदींना “माझे प्रिय मित्र” असे म्हटले, ज्याचे व्हिडिओ भारतात बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाले आहे. मोदींच्या दोन दिवसांच्या दौर्‍यामध्ये मोदीजी आणि पुतिन यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करत भारत-रशिया संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेंस्की यांनी मात्र या दौर्‍यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि मोदींच्या भेटीला शांतता प्रयत्नांना धक्का मानले.

पाश्चिमात्य देशांमध्ये रशियाच्या आक्रमणाविरोधात कडक भूमिका घेतली जात असताना, भारताच्या लोकप्रतिनिधींनी पुतिन यांच्यावर कोणतीही स्पष्ट टीका केली नाही. मोदी यांनी शांतता स्थापनेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि युद्धाने कोणचेही समाधान होणार नसल्याचे म्हणाले.

भारतीय पंतप्रधान मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांना सांगितले की, युक्रेनच्या युद्धाचे समाधान युद्धभूमीवर नाही तर शांततेच्या मार्गाने शोधले पाहिजे. मोदींनी पुतिन यांना “शांततेसाठी प्रयत्न” करण्याचे आवाहन केले आणि रुग्णालयातील मुलांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

रशियावर पाश्चिमात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे रशिया भारतासोबत व्यापार वाढवत आहे. भारताने सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी करून रशियाला मोठी आर्थिक मदत केली. यामुळे भारतासोबतचा द्विपक्षीय व्यापार ६५ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. नरेंद्र मोदींच्या या दौर्‍यामध्ये व्यापार असंतुलन कमी करण्यावर आणि रशियन गुंतवणूक वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.

भारत-रशिया संबंधांमध्ये संरक्षण क्षेत्रातील सहकार्य महत्त्वाचे आहे. शीतयुद्धाच्या काळापासून दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य चालत राहिले आहे. आतापर्यंत रशियाने भारताला अनेक अणुऊर्जा प्रकल्पांसाठी तांत्रिक मदत केली आहे. युक्रेन युद्धानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवली आहे आणि काही संरक्षण उपकरणांच्या पुरवठ्याबाबतहि चर्चा केली आहे.

पाश्चिमात्य देशांनी युक्रेन युद्धानंतर रशियावर निर्बंध लादल्यामुळे पुतिन यांनी चीन, भारत, तुर्की यासारख्या महत्त्वाच्या देशांशी संबंध दृढ करत आहे. परंतु चीनसोबतचे रशियाचे संबंध भारतासाठी अतिशय चिंताजनक आहे कारण भारत-चीन सीमेवरील तणाव वाढला आहे. रशियाने या तणावामध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.

पंतप्रधानांच्या या दौर्‍यामुळे भारताच्या विदेश धोरणामध्ये स्थिरता आणि सहकार्य दिसून येत आहे. भारत-रशिया संबंध भविष्यात अधिक दृढ होतील असा विश्वास आहे.

 

महत्त्वाची माहिती (mahasandesh)

प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,

तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.

सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

 

Are you looking for the latest government job notifications?

mahasandesh has covered comprehensive updates on new government recruitment. Whether you’re searching for 12th pass government job or central government jobs, our platform provides the most government job vacancy 2024. Stay informed about every government job notification, including the latest central government vacancy 2024.

Explore our detailed government job list to find opportunities that match your qualifications. From government jobs after 12th to a complete government job list after graduation, we offer extensive information to help you secure your dream position. Keep visiting mahasandesh for the latest sarkari government vacancy updates and 2024 government recruitment.

Leave a Comment