Sarfira movie review 2024 | Akshay Kumar is Back

Sarfira movie review 2024: प्रेक्षकांचे रिव्हिव पाहता “सर्फिरा” चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे असे लक्षात येते. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अक्षय कुमार आहे आणि याच दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केले आहे. हा चित्रपट एका तमिळ चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे ज्याचे नाव “सूरराई पोट्रु” आहे. हा चित्रपट जी. आर. गोपीनाथ यांच्या आत्मचरित्रावर आधारित आहे. “सर्फिरा” चित्रपटात एका माणसाची संघर्षमय कहाणी दाखवली आहे ज्याचे स्वप्न सर्वसामान्यांसाठी कमी खर्चात विमान प्रवास असे असते.

Sarfira movie review 2024
Sarfira movie review 2024

Sarfira movie review 2024

विरेंद्र वीर म्हात्रे (अक्षय कुमार) हा महाराष्ट्रातील एका छोट्या गावातील मध्यमवर्गीय मुलगा आहे, ज्याचे कमी खर्चात विमान कंपनी सुरू करण्याचे स्वप्न आहे . या स्वप्नासाठी तो अनेक अडचणींना सामोरे जातो. त्याचा संघर्षात अनेक अडथळे येतात ज्यातील मुख्य अडथळा म्हणजे, विमान वाहतूक क्षेत्रातील मोठ्या कंपन्याचे खेळाडू पारेष गोस्वामी (परेश रावल). विरेंद्र आपल्या वडिलांच्या अहिंसात्मक तत्त्वांवर विश्वास ठेऊन वागत असतो , परंतु त्याच्या वडिलांचा विचार त्याच्या मार्गात येतो. विरेंद्रच्या वडिलांच्या विरोधातला संघर्ष आणि त्याचा स्वप्नांचा पाठलाग या वर हा चित्रपट आधारित आहे.

विरेंद्रचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासात त्याच्या सोबत त्याची पत्नी राणी उर्फ राधिका मदान असते, जी स्वतःच्या बेकरी व्यवसायात यशस्वी होण्याचे स्वप्न पाहत असते. त्या दोघांचा वयाच्या फरकामुळे कधी-कधी त्यांच्या जोडीची जुळवाजुळव अस्वस्थ करते.परंतु अक्षय कुमारच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. राधिकाच्या अभिनयाने तिच्या चरित्राला एक विशेष रंग दिला आहे. मात्र त्यांचा तुलनेत परेश रावल यांचा अभिनय कमकुवत वाटतो.

अक्षय कुमारने आपल्या भूमिकेत प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने अभिनय केला आहे. नेहेमीप्रमाणेच त्याच्या प्रशिक्षणाच्या दृश्यांमध्ये त्याच्या शारीरिक क्षमतेचे प्रदर्शन दिसून येते.

“सर्फिरा” चित्रपट प्रेक्षकांना प्रेरित देणारा, भाऊक करणारा आणि आनंद देणारा आहे. विरेंद्रच्या यशाची कथा नवीन पिडीतील प्रेक्षकांना स्वप्न पाहण्याची एक वेगळीच प्रेरणा देते.

 

महत्त्वाची माहिती (mahasandesh)

प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,

तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.

सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

Leave a Comment