India vs Zimbabwe 3rd T20I Highlights | भारत विरुद्ध झिम्बाब्वे ३रा टी२० सामना: हायलाइट्स आणि संपूर्ण विश्लेषण

India vs Zimbabwe 3rd T20I Highlights (भारत विरुद्ध झिम्बाब्वे ३रा टी२० सामना): हायलाइट्स आणि संपूर्ण विश्लेषण): भारताने झिम्बाब्वेविरुद्ध तिसरा टी२० सामन्यामध्ये भारतीय टीम ने टॉस जिकंत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा सामना जिंकत ५ सामन्यांच्या या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. अंतिम षटकात अवेश खानने १८ धावा दिल्या तरी सुद्धा भारताने २३ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वे संघासमोर १८३ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु भारतीय संघाने झिम्बाब्वे संघाला १५९ धावांवरच रोखले.

India vs Zimbabwe 2024
India vs Zimbabwe 2024 Pic credit India Today

India vs Zimbabwe 3rd T20I Highlights

या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. फलंदाजी दरम्यान शुभमन गिल आणि रुतुराज गायकवाड यांचा उत्कृष्ठ कामगिरीचा जोरावर भारताने १८२ धावांची मजल मारली. यामध्ये गिलने ४९ चेंडूत ६६ धावा केल्या तर रुतुराज गायकवाडने २८ चेंडूत ४९ धावा केल्या. गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदरने १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या तर अवेश खानने २ विकेट्स घेतल्या.

झिम्बाब्वेच्या डियोन मायर्स आणि क्लाइव्ह मांडंडे यांनी सहाव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली होती. मायर्सने आपले पहिले टी२० अर्धशतक पूर्ण करत ४९ चेंडूत नाबाद ६५ धावा केल्या. झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी अनेक चुका केल्यामुळे भारताचा स्कोअर अधिक मजबूत झाला.

भारताकडून वॉशिंग्टन सुंदर या मालिकेचा ‘सामनावीर’ ठरला. वॉशिंग्टन सुंदरने ४ षटकांत १५ धावांत ३ विकेट्स घेत या सामन्यात आपले महत्तवाचे योगदान दिले. झिम्बाब्वेकडून फलंदाजी करताना मायर्सने यांनी ६५ धावा केल्या तर मांडंडेने यांनी २६ चेंडूत ३७ धावा केल्या.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शुभमन गिलने ३६ चेंडूत या मालिकेत पहिले टी२० अर्धशतक केले. भारतीय संघाचा वर्ल्ड कप टीम मध्ये असलेला यशवी जयस्वाल, जो पहिल्या दोन सामन्यांत नव्हता, त्याने २७ चेंडूत ३६ धावा केल्या. रुतुराज गायकवाडने २८ चेंडूत ४९ धावा करत उत्कृष्ट फलंदाजी केली.

झिम्बाब्वेतर्फे सिकंदर रझा आणि मुजारबानी यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

चौथा टी२० सामना १३ जुलै खेळाला जाणार आहे, तर पाचवा सामना १४ जुलै रोजी होणार आहे. या मालिकेत सध्या भारत २-१ ने आघाडीवर मिळवली आहे. भारताने जिंकलेल्या या सामन्यामुळे मालिकेमढील विजयाची शक्यता वाढवली आहे.

या विजयसाहित भारतीय संघ आता पुढील येणाऱ्या सामन्यांमध्ये अधिक आत्मविश्वासाने खेळेल. तसेच, झिम्बाब्वेने त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये अधिकाधिक सुधारणा करावी लागणार आहे तसेच मागील सामन्यांमधल्या झालेल्या चुका सुद्धा टाळाव्या लागतील जर त्यांना या मालिकेत पुनरागमन करायचे असेल.

India vs Zimbabwe खेळाडूंची यादी

भारत: यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुभमन गिल (कॅप्टन), रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अवेश खान, खलील अहमद.

झिम्बाब्वे: तदिवानाशे मरुमानी, वेसली मदेवेरे, ब्रायन बेनेट, डियोन मायर्स, सिकंदर रझा (कॅप्टन), जॉनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मांडंडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकाझा, रिचर्ड एंगरावा, ब्लेसिंग मुजारबानी, तेंडाई चाटारा.

महत्त्वाची माहिती (mahasandesh)

प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,

तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.

सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

 

Leave a Comment