Zika Virus: झिका व्हायरसचा धोका वाढला आहे. आणखी दोघांना झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे झिका व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. झिका व्हायरस म्हणजे नेमके काय तो कसा पसरतो त्याची लक्षणे आणि यापासून बचावासाठी काय करावे किंवा प्रतिबंधात्मक उपाय याविषयी आपण या लेखमध्ये जाणून घेणार आहोत.
Zika Virus
![Zika Virus Disease](https://mahasandesh.com/wp-content/uploads/2024/07/Untitled-4-13-1024x576.png)
झिका व्हायरस म्हणजे काय आणि तो कसा पसरतो ? / Zika Virus means what and how can it will spread?
झिका व्हायरस सर्वप्रथम युगांडामध्ये झिका नावाच्या जंगलमध्ये आढळला होता. झिका व्हायरस हा रोग एडीस एजिप्टी आणि एडीस अल्बोपिक्टस नावाच्या डासांच्या चाव्यामुळे होतो. हा व्हायरस इतर काही रोगांप्रमानेच डास चावल्यावर पसरतो. डास चावल्यानंतर काही दिवसातच झिका व्हायरसची लक्षणे दिसू लागतात. मुख्यतः झिका हा विषाणू मादी एडीस एजिप्ती डासांद्वारे पसरतो, मुख्यतः सहसा हे डास दिवसा सक्रिय असतात.
झिका व्हायरस ची लक्षणे / Zika Virus Symptoms:
- ताप येणे.
- डोळ्यांत जळजळ होणे किंवा डोळे लाल होणे आणि सुजणे.
- डोकेदुखी.
- स्नायूदुखी किंवा सांधेदुखी.
- त्वचेवर पुरळ किंवा लाल चट्टे येणे.
झिका व्हायरस उपचार/ Zika Virus Treatment 2024:
या व्हायरससाठी सध्या कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना अधिक आराम आणि भरपूर द्रवपदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो.
झिका व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी काय करावे:
- झिका व्हायरस टाळण्यासाठी, डास चावण्यापासून स्वत:चे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- घराजवळ पाणी साचू देऊ नका, ज्यामुळे डासांची वाढ होऊ शकते.
- संपूर्ण शरीर झाकणारे कपडे परिधान करा आणि डासांपासून बचाव करणारे औषध वापरा.
- गर्भवती महिलांनी डासांचा प्रसार होणाऱ्या भागात जाणे टाळावे.
- सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी गर्भनिरोधकांचा वापर करा आणि दोघांनीही २-३ महिने लैंगिक संयम पाळावा.
- ताप, डोकेदुखी, किंवा त्वचेवर पुरळ यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
महत्त्वाची माहिती (mahasandesh)
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
![]() |
येथे क्लिक करा |
Are you looking for the latest government job notifications?
mahasandesh has covered comprehensive updates on new government recruitment. Whether you’re searching for 12th pass government job or central government jobs, our platform provides the most government job vacancy 2024. Stay informed about every government job notification, including the latest central government vacancy 2024.
Explore our detailed government job list to find opportunities that match your qualifications. From government jobs after 12th to a complete government job list after graduation, we offer extensive information to help you secure your dream position. Keep visiting mahasandesh for the latest sarkari government vacancy updates and 2024 government recruitment.