मोफत शिलाई मशीन योजना 2024 | Free Silai machine Yojana 2024

Free Silai machine Yojana 2024 (मोफत शिलाई मशीन योजना 2024) महिलांसाठी आनंदाची बातमी! अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

महिलांसाठी एक खुशखबर घेऊन आलेलो आहोत. मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 सर्व महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने मोफत शिलाई मशीन योजना सुरू करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. इच्छुक कष्टकरी महिलांना स्वतःचा खर्च सहजपणे पूर्ण करण्यासाठी हा एक उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा एक मोठा उद्देश आहे. मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरी भागातील महिला तसेच ग्रामीण भागातील महिलांना सहभाग घेता येणार आहे.

मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज कसा करायचा, योजनेसाठी कोण पात्र आहे, वयोमर्यादा किती पाहिजे?, कोणत्या पात्रतेची आवश्यकता आहे संपूर्ण योजनेची अचूक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत संपूर्ण वाचा.

Free Silai machine Yojana 2024
Free Silai machine Yojana 2024

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

 

मोफत शिलाई मशीन योजना 2024 तपशील:

तपशील योजनेचा तपशील
योजनेचे नाव मोफत शिलाई मशीन योजना
योजनेचा उद्देश्य महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे.
लाभार्थी शहरी व ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिला
लाभ मोफत शिलाई मशीन देणे

 

लाडकी बहीण योजने बाबत मोठी घोषणा नियम पुन्हा बदलले, फक्त बदललेले नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Free Silai machine Yojana 2024 (मोफत शिलाई मशीन योजना 2024) 

योजनेचा उद्देश:

  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन प्रदान करणे आहे
  • गरीब कुटुंबातील महिलांना घरच्या घरी लघुउद्योग सुरू करणे.
  • महिलांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करून देणे.
  • महिलांना स्वतःच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
  • शहरी व ग्रामीण भागातील महिलांना स्वालंबी बनवणे.
  • महाराष्ट्रातील महिलांना कुशल विकासासाठी प्रोत्साहन करणे.

योजना लाभार्थी:

महाराष्ट्र राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिला

योजना पात्रता:

• फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
• बाहेर राज्य बाहेरच्या राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
• योजनेचा लाभ घेण्यासाठी वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
• एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
• कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखापेक्षा जास्त नसावे.
• अर्जदार महिलाकडे शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे.
• अर्जदार महिलेच्या घरातील कुटुंबीयातील सदस्य सरकारी नोकरीच्या कार्यरत नसावे.
• अर्जदार महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
• अपंग असलेली महिलांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रे आवश्यक असेल.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे:

1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. उत्पन्नाचा दाखला
4. जन्म दाखला
5. रहिवासी प्रमाणपत्र
6. जातीचे प्रमाणपत्र
7. रेशन कार्ड(पिवळे किंवा केशरी)
5. अपंग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र
6. शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र
7. विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र
6. मोबाईल क्रमांक
7. पासपोर्ट आकाराचे फोटो

Free Silai machine Yojana 2024

अर्ज प्रक्रिया कशी आहे?

  • अर्जदाराला योजनेचा अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुमच्या जवळील नगरपालिक, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद कार्यालयात महिला व बालकल्याण विकास विभागाकडे जाऊन योजनेची चौकशी करायची आहे.
  • महिला बालकल्याण विभागातून मोफत शिलाई मशीन योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे.
  • अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरून, आवश्यक ते सर्व कागदपत्राचे झेरॉक्स जोडायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा फॉर्म जिल्हा परिषद कार्यालयात किंवा नगरपालिकेत जाऊन सबमिट करायचा आहे.
  • अर्ज प्रक्रिया संपूर्ण झालेली पोचपावती घ्यायची आहे.
  • संबंधित अधिकाऱ्याकडून तुमचा अर्ज पुढे पाठवण्यात येईल.
  • त्यानंतर अधिकाऱ्याकडून तुमची अर्जाची पडताळणी झाल्यावर तुम्हाला सुचित केले जाईल.
  • तुम्ही जर मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्र असल्यास तर तुम्हाला शिलाई मशीनचे वाटप केले जाईल.

 

माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट App वरून | Mazi Ladki Bahin Yojana App | Narishakti Doot App 2024 जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

This page includes info about free silai machine yojana, free silai machine yojana 2024, free silai machine yojana online registration, free silai machine yojana 2024 last date, pm free silai machine yojana, free silai machine yojana 2024 online apply, free silai machine yojana 2023, मोफत शिलाई मशीन योजना 2024

Leave a Comment