Rohit Sharma Retirement टीम इंडियाला टी-२० वर्ल्ड कप २०२४ विश्व विजेतेपद जिंकून देत कोहलीपाठोपाठ कॅप्टन रोहित शर्माने सुद्धा टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
Rohit Sharma Retirement from T20 World Cup
भारतीय संघाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप २०२४ च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी मात करत दारुण पराभव केला आहे. तर रोहित शर्माने १३ वर्षानंतर पुन्हा एकदा चाहत्यांचा स्वप्नांची स्वप्न पूर्ती केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला १७७ धावांचे आव्हान देत १६९ धावांमध्ये रोखण्यात यश मिळवले आणि कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कपच्या विश्व विजेतेपदावर नाव कोरलं.
विराटनंतर कॅप्टन रोहित शर्माचा निवृत्तीचा निर्णय
ऐतिहासिक विजयानंतर भारताचे माजी कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये हा आपला शेवटचा विश्वचषक आहे असे म्हणत निवृत्ती जाहीर केली तर कोहलीपाठोपाठ कॅप्टन रोहित शर्माने सुद्धा टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली त्यासोबतच रोहित आणि विराट युगाचा अंत झाला .
रोहितने भारताकडून १५९ टी-२० सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने ४२३१ धावा बनवल्या आहेत. या स्वरूपात त्याने ५ शतके आणि ३२ अर्धशतके झळकावली आहेत. रोहितची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद १२१ धावा आहे.
विराट आणि रोहितसारखे अनुभवी खेळाडू निवृत्त झाल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये निराशा आहे. तरीही, वर्ल्ड कप नंतर त्यांची निवृत्ती असल्यामुळे काही चाहत्यांना आनंदही आहे. अनेक लोकांच्या मते, रोहित आणि विराटने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे.
महत्त्वाची माहिती (mahasandesh)
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |