Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 | लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 (लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024) च्या अंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाईल. महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांच्या कल्याणासाठी एक नवी योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे त्यांना शिक्षण किंवा नोकरीच्या संधी शोधण्यासाठी मदत मिळेल. या योजनेचे नाव ‘लाडका भाऊ योजना महाराष्ट्र’ आहे. या योजनेची घोषणा नुकतीच मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला लाडका भाऊ योजना महाराष्ट्र या नावाने सुरू करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाशिवाय किती रकमेची आर्थिक मदत दिली जाईल आणि अर्ज करण्यासाठी कोणत्या पात्रतेची आवश्यकता आहे याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Ladka Bhau Yojana Maharashtra
Ladka Bhau Yojana Maharashtra

 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

 

या योजनेच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे दिले जाणारे हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. याशिवाय योजनेचा लाभार्थींना आर्थिक सहाय्य देखील दिले जाईल.

 

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 तपशील:

तपशील योजनेचा तपशील
योजनेचे नाव लाडका भाऊ योजना महाराष्ट्र (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण )
योजनेचा उद्देश्य महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना कौशल्य प्रशिक्षणासहित आर्थिक मदत
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 18 ते 35 वर्षातील तरुणांना
लाभ १०,००० रुपयापर्यंतची मदत
अधिक माहितीसाठी
येथे क्लिक करा

 

लाडकी बहीण योजने बाबत मोठी घोषणा नियम पुन्हा बदलले, फक्त बदललेले नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण)  2024 

योजनेचा उद्देश:

  • बेरोजगार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण
  • लाभार्थींना आर्थिक सहाय्य दिले जाईल

योजना सारांश:

बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणसह १०००० रुपये दरमहा पर्यंत आर्थिक मदत दिली जाणार. उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. मोठ्या प्रकल्पांना, उद्योगांना, स्टार्टअप्सना, आणि विविध आस्थापनांना लागणारे मनुष्यबळ याच संकेतस्थळावरून नोंदवता येईल. या योजनेअंतर्गत दरवर्षी १० लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध होतील. या इंटर्नशिपची कालावधी ६ महिने असेल आणि उमेदवारांना या काळात विद्यावेतन दिले जाईल, जे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

योजना लाभार्थी:

महाराष्ट्र राज्यातील 18 ते 35 वर्षातील बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक शिक्षण झालेल्या तरुणांना

योजना पात्रता:

• उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ३५ वर्षे असावे.
• शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवाराने १२वी पास किंवा आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे.
• उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
• उमेदवाराचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
• उमेदवाराचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे.
• कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उमेदवाराने नोंदणी केलेली असावी.

अ.क्र. शैक्षणिक अर्हता प्रतिमाह मिळणारी रक्कम
1 १२ वी पास रु. 6,०००/-
2 आय.टी.आय/ पदविका रु. 8,०००/-
3 पदवीधर/ पदव्युत्तर रु. १०,०००/

लाडकी बहीण योजने बाबत मोठी घोषणा नियम पुन्हा बदलले, फक्त बदललेले नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

1. आधार कार्ड
2. आधिवास प्रमाणपत्र
3. पासपोर्ट आकाराचा फोटो
4. मोबाइल नंबर
5. शैक्षणिक प्रमाणपत्र
6. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
7. ड्राइविंग लाइसेंस

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024

अर्ज प्रक्रिया कशी आहे?

  • अर्ज विनामूल्य असतील आणि ते पोर्टल द्वारे ऑनलाईन भरता येतील.
  • पात्र लाभार्थींना ऑनलाईन अर्ज https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर भरता येईल.

 

माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट App वरून | Mazi Ladki Bahin Yojana App | Narishakti Doot App 2024 जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न(Frequently Asked Questions- FAQ)

1.लाडका भाऊ योजनेचे लाभार्थी कोण असतील?

उत्तर: बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक शिक्षण झालेले तरुण.

2. योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची मर्यादा किती आहे?

उत्तर: अर्जदाराचे वय १८ वर्षे ते ३५ वर्षे दरम्यान असावे.

3. लाडका भाऊ महाराष्ट्र योजना म्हणजे काय?

उत्तर: बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणसह १०००० रुपये दरमहा पर्यंत आर्थिक मदत दिली जाणार.

4. लाडका भाऊ महाराष्ट्र योजनेचे फायदे काय आहे ?

उत्तर: बँक खात्यात दरमहा १००००/- रु. पर्यंत जमा केले जातील.

महत्त्वाची माहिती (mahasandesh)

प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,

तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.

सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

Leave a Comment