Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 (मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024) चा जीआर प्रकाशित करण्यात आलेला आहे. राज्यातील सर्व महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देणारी ही जी योजना आहे. त्या योजनेसाठी काय काय नियम अटी आहेत कोण कोण लाभार्थी या ठिकाणी पात्र होतील अर्ज कसा भरायचा कागदपत्रे कोणती लागतील याची माहिती या लेख मध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो या योजनेमध्ये वेळोवेळी जे काही बदल होतील जे काही अपडेट येतील त्याची माहिती वेळोवेळी आपल्या लेख मध्ये देत राहणार आहोत.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा आणि अशा प्रकारचा शासकीय योजना, शेतकरी योजना आणि शासकीय नोकरीच्या अधिसूचनांसाठी खाली दिलेल्या आमच्या सामाजिक प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला फॉलो करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास 28 जून 2024 मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व महिला ज्यांचं वय 21 ते 65 या वयोगटामध्ये आहे त्या सर्व महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देणारी ही योजना आहे. या योजनेसाठी सोमवार एक जुलै 2024 पासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 तपशील:
तपशील | योजनेचा तपशील |
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
योजनेचा उद्देश्य | महिला आत्मनिर्भर बनाव्यात, सशक्तीकरणास चालना देणे तसेच उत्तम पोषण आणि आरोग्याची देखभालीसाठी आर्थिक मदत |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्तया आणि निराधार महिला |
लाभ | 1500/- रुपये |
अधिक माहितीसाठी |
येथे क्लिक करा |
लाडकी बहीण योजने बाबत मोठी घोषणा नियम पुन्हा बदलले, फक्त बदललेले नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024
योजनेचा उद्देश:
- महिला आत्मनिर्भर बनाव्यात
- महिला सशक्तीकरणास चालना
- महिलांना उत्तम पोषण आणि आरोग्याची देखभालीसाठी आर्थिक मदत
योजना सारांश:
पात्रता कालावधी दरम्यान, प्रत्येक पात्र महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा रु. १,५००/- जमा केले जातील. जर ती महिला केंद्र किंवा राज्य सरकारच्या अन्य आर्थिक योजनेतून रु. १,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल, तर त्या फरकाची रक्कम या योजनेतून दिली जाईल.
योजना लाभार्थी:
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्षातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्तया आणि निराधार महिला
योजना पात्रता:
- योजनेच्या पात्रतेसाठी आधी आधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते. आता, लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र नसल्यास, त्यांनी 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, किंवा जन्म दाखला यांपैकी कोणतेही एक दस्तावेज दिल्यास ते मान्य केले जाईल.
लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी. - विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- अर्जदाराचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे बँक खाते असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा कमी असावे.
- रु.2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसल्यास, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे.
- कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह केलेल्या परराज्यातील महिलांसाठी त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, किंवा आधिवास प्रमाणपत्र यांपैकी कोणतेही एक दस्तावेज मान्य असेल.
योजना अपात्रता:
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त आहे.
- ज्या कुटुंबातील कोणीतरी आयकर भरणारा आहे.
- ज्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम / मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
- लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर योजनांद्वारे रु. १,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असल्यास ती अपात्र ठरेल.
- कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असल्यास ते अपात्र ठरतील.
- कुटुंबातील सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/मंडळ/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य असल्यास ते अपात्र ठरतील.
- या योजनेतून 5 एकर शेतीची अट काढून टाकली आहे.
ज्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. - ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
लाडकी बहीण योजने बाबत मोठी घोषणा नियम पुन्हा बदलले, फक्त बदललेले नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
1. ऑनलाईन अर्ज
2. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
3. योजनेच्या पात्रतेसाठी आधी आधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते. आता, लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र नसल्यास, त्यांनी 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, किंवा जन्म दाखला यांपैकी कोणतेही एक दस्तावेज दिल्यास ते मान्य केले जाईल. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला
4. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असावे)
5. रु.2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसल्यास, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे.
6. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
7. पासपोर्ट आकाराचा फोटो
8. रेशनकार्ड
9. महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह केलेल्या परराज्यातील महिलांसाठी त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, किंवा आधिवास प्रमाणपत्र यांपैकी कोणतेही एक दस्तावेज मान्य असेल.
10. योजनेच्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र
Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 च्या महत्तवाचा तारखा:
अ.क्र. | उपक्रम | वेळेची मर्यादा |
1 | अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात | १ जुलै, २०२४ |
2 | अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक | |
3 | तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक | १६ जुलै, २०२४ |
4 | तात्पुरत्या यादीवरील तक्रार/ हरकती प्राप्त करण्याचा कालावधी | १६ जुलै, २०२४ ते २० जुलै २०२४ |
5 | तक्रार/ हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी | २१ जुलै २०२४ ते ३० जुलै २०२४ |
6 | अंतिम यादी प्रकाशन दिनांक | ०१ ऑगस्ट, २०२४ |
7 | लाभार्थ्याचे बँकेमध्ये E-KYC करणे | १० ऑगस्ट, २०२४ |
8 | लाभार्थी निधी हस्तांतरण | १४ ऑगस्ट, २०२४ |
9 | त्यानंतरच्या महिन्यांत देय दिनांक | प्रत्येक महिनाच्या १५ तारखेपर्यंत |
या योजनेत अर्ज करण्याची मुदत आधी 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 होती. आता ती मुदत वाढवून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अ.क्र. 3 ते 9 चा तारखांमध्ये बदल होऊ शकतो.
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
- अर्ज विनामूल्य असतील आणि ते पोर्टल, मोबाइल अॅप किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरता येतील.
- पात्र महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.
- ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरणे कठीण आहे, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्रे, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत, वार्ड कार्यालये किंवा सेतू सुविधा केंद्रांमध्ये अर्ज भरण्याची सोय असेल.
- भरण्यात आलेले अर्ज यथायोग्य अधिकाऱ्यांद्वारे ऑनलाईन सादर केले जातील आणि यशस्वी अर्जांसाठी पोच पावती दिली जाईल.
- महिलेने स्वतः उपस्थित राहून फोटो काढणे आणि E-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील माहिती आणणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सरकारने एक ॲप लाँच केले आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या या ॲपच्या माध्यमातून महिलांना लाडकी बहिण योजना साठी अर्ज करता येणार आहे. हा ॲप पात्र महिलांसाठी योजना नोंदणी व लाभ मिळविण्यासाठी एक इंटरफेस म्हणून कार्य करतो. महिलांनी सरकारी कार्यालयांना भेट देण्याची गरज वाटू नये, यासाठी सरकारने हे सॉफ्टवेअर जारी केले आहे. ॲप महिलांना सोपी अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देतो.
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट App वरून | Mazi Ladki Bahin Yojana App | Narishakti Doot App 2024 जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न(Frequently Asked Questions- FAQ)
1.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कोण असतील?
उत्तर: विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
2. योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची मर्यादा किती आहे?
उत्तर: अर्जदाराचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे.
3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय?
उत्तर: राज्यातील सर्व महिला ज्यांचं वय 21 ते 65 या वयोगटामध्ये आहे त्या सर्व महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देणारी ही योजना आहे.
4. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती असावे?
उत्तर: वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असावे
5. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फायदे काय आहे ?
उत्तर: महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा रु. १,५००/- जमा केले जातील
महत्त्वाची माहिती (mahasandesh)
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |