Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2024 (प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024) आपल्या देशातील बहुसंख्य महिला या दारिद्र्यरेषा खालील आहेत. त्यामुळे महिला गर्भवती असताना देखील गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करावी लागते. त्यामुळे त्यांना पोषक आहार आणि पुरेसा आराम मिळत नाही आणि त्याचा परिणाम गर्भामध्ये असणाऱ्या नवजात शिशुच्या आरोग्यावरती होतो. म्हणून गर्भावस्थेत महिलांना उत्तम पोषण पुरेसा आराम मिळावा आणि गर्भवती महिला व त्यांच्या नवजात बालकाच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा आणि अशा प्रकारचा शासकीय योजना, शेतकरी योजना आणि शासकीय नोकरीच्या अधिसूचनांसाठी खाली दिलेल्या आमच्या सामाजिक प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला फॉलो करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |
Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2024 (प्रधानमंत्री मातृ वंदना योजना) तपशील
तपशील | योजनेचा तपशील |
योजनेचे नाव | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना |
योजनेचा उद्देश्य | गर्भवती महिलांच्या उत्तम पोषण आणि आरोग्याची देखभालीसाठी आर्थिक मदत |
लाभार्थी | गर्भवती महिला |
लाभ | 5000/- रुपये |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची उद्दिष्टे
- गर्भवती महिलांना व त्यांच्या नवजात बालकाला योग्य पोषण आणि चांगले आरोग्य मिळावे.
- नवजात बालकाला कुपोषित जन्मण्यापासून वाचवणे.
- गर्भवती महिला आणि नवजात बालकाचे प्रसूती दरम्यान मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची वैशीष्टे
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2017 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे.
- या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.
- नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास या योजनेचा लाभ त्या टप्प्यापुरताच मर्यादित असेल.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ
- गर्भवती महिलांना योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
- महिलेचे व तिच्या पतीचे सहमती पत्रे, आधार संबंधित माहिती आणि लाभार्थी गर्भवती महिलेचे आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट खाते असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस 3 हप्त्यांमध्ये 5,000/- रुपये इतकी रक्कम मिळेल.
- पहिला हप्ता: गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात 1000/- रुपये जमा करण्यात येईल.
- दुसरा हप्ता: गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास महिलेच्या खात्यात 2000/- रुपये जमा करण्यात येईल.
- तिसरा हप्ता: गर्भवती महिलेची प्रसूतीनंतर झाल्यावर नवजात शिशूची जन्मनोंदणी व प्राथमिक लसीकरण (बीसीजी, ओपीव्ही, हिपॅटॅटीस बी तसेच पेन्टाव्हॅलेन्टचे 3 व ओपीव्हीच्या 3 कींवा समतूल्य लसीकरण केल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात 2000/- रुपये जमा करण्यात येईल.
- लाभार्थी महिलेची प्रसूती शासकीय रुग्णालयात झाल्यास जननी सुरक्षा योजनेअंतर्गत सुद्धा 600 – 1000 रुपयांचा लाभ घेता येईल.
Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2024 या योजनेची पात्रता
- अर्जदार भारताचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत फक्त एकदाच लाभ मिळू शकतो.
- गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला या योजनेसाठी अर्ज करू शकता.
- लाभ घेणाऱ्या महिलेचे वय किमान 19 वर्षे असावे.
- लाभार्थी गर्भवती महिलेचे आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट खाते असणे आवश्यक आहे.
- महिलेचे व तिच्या पतीचे सहमती पत्रे, आधार संबंधित माहिती असणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आवश्यक कागदपत्रे
- महिलेचे व तिच्या पतीचे स्वाक्षरी केलेले हमीपत्र/सहमती पत्रे
- महिला व तिच्या पतीचा ओळखीचा पुरावा (आधारकार्ड )
- MCP कार्ड (माता-बाल संरक्षण कार्ड)
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- लाभाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी: किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शविणारी MCP कार्डची छायाप्रत.
- लाभाच्या तिसर्या हप्त्यासाठी: जन्म नोंदणीची एक प्रत आणि लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असे दर्शवणारे MCP कार्ड.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी संपर्क
ग्रामीण क्षेत्र: एएनएम पात्र लाभार्थींना विहित नमुना 1A चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्विकारेल आणि अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका अधिकाऱ्यांकडे सादर करणे. हा अर्ज भरण्याची जबाबदारी आरोग्य केंद्र सहाय्यकाची(एएनएमची) आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून हा अर्ज तालुका अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करतील. लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती विहित संकेतस्थळावर तालुका अधिकाऱ्यांमार्फत भरली जाईल. राज्यस्तरावरून संगणकीय प्रणालीद्वारे लाभ अदा करण्यात येईल .
नगरपालिका क्षेत्र: पात्र लाभार्थ्यांना विहित फॉर्म 1A देऊन पूर्ण केलेला अर्ज स्वीकारून प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका अधिकाऱ्यांकडे सादर करणे. पूर्ण केलेला अर्ज हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यअधिकाऱ्याकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर आरोग्य पोस्ट वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहितीची पडताळणी करून तो अर्ज मुख्यअधिकाऱ्याकडे सादर करतील. मुख्यअधिकारी लाभार्थी महिलेचा अर्ज विहित संकेतस्थळावर भरतील.
महानगरपालिका क्षेत्र: मुंबई तसेच इतर महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्र सहाय्यक(एएनएम) पात्र लाभार्थी महिलेला विहित फॉर्म 1A देऊन परिपूर्ण भरलेला अर्ज स्वीकारतील. हा अर्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न(Frequently Asked Questions- FAQ)
1.प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे लाभार्थी कोण असतील?
उत्तर: गर्भवती महिला
2. योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची मर्यादा किती आहे?
उत्तर: 19 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे
3. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना म्हणजे काय?
उत्तर: गर्भावस्थेत महिलांना उत्तम पोषण पुरेसा आराम मिळावा आणि गर्भवती महिला व त्यांच्या नवजात बालकाच्या पोषण आणि आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे.
4. योजनेचा अधिकृत संकेत स्थळ कोणते आहे?
उत्तर: अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्त्वाची माहिती – mahasandesh
दैनिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी रोज https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
आम्ही तुमच्यासाठी रोजच्या महत्त्वाच्या बातम्यांची माहिती देणारा एक ब्लॉग तयार केला आहे. सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |