Pradhan Mantri Ujjwala Yojana(प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024): मोफत गॅस कनेक्शन पुरवण्यासाठी केंद्र सरकारने भारतातील गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांनासाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरु केली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे. या योजनेचा उद्देश गरीब महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आहे, ज्यामुळे त्यांना स्वयंपाक करताना होणाऱ्या धुरापासून मुक्तता मिळेल आणि त्यांच्या आरोग्याचे संरक्षण होईल.
या योजनेद्वारे आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांनी मोफत एलपीजी गॅस कनेक्शन मिळवले आहे. विशेष म्हणजे, या योजनेंतर्गत महिलांना केवळ गॅस कनेक्शनच नव्हे तर त्यासोबत गॅस शेगडीदेखील मोफत दिली जाते. यामुळे महिलांचा स्वयंपाकाच्या कामात होणारा त्रास कमी झाला आहे आणि त्यांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ पर्याय मिळाला आहे.
उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्यामध्ये अधिकाधिक गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024 तपशील:
तपशील | योजनेचा तपशील |
योजनेचे नाव | प्रधानमंत्री उज्ज्वला योजना |
योजनेचा उद्देश्य | मोफत एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी |
लाभार्थी | गरीब कुटुंबातील महिला |
लाभ | मोफत एलपीजी कनेक्शन |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
लाडकी बहीण योजने बाबत मोठी घोषणा नियम पुन्हा बदलले, फक्त बदललेले नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
Pradhan Mantri Ujjwala Yojana 2024
योजनेचा उद्देश:
- 8 कोटी एलपीजी कनेक्शनचे उद्दिष्ट: गरीब कुटुंबांना एलपीजी कनेक्शन दिले जाण्याचे उद्दिष्ट होते.
- महत्त्वाची घटना: 7 सप्टेंबर 2019 रोजी, महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे पंतप्रधानांनी 8 कोटी एलपीजी कनेक्शनचा वाटप केला.
- उज्ज्वला 2.0: या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 1.6 कोटी एलपीजी कनेक्शन उपलब्ध करण्यात आली आहेत, ज्यात स्थलांतरित कुटुंबांसाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे.
योजना लाभार्थी:
गरीब कुटुंबातील महिला
योजनेची फायदे:
- रोख सहाय्य: प्रत्येक एलपीजी कनेक्शनसाठी केंद्र सरकारकडून ₹1600 पर्यंत रोख सहाय्य दिले जाते (14.2 किलो साठी ₹1250 आणि 5 किलो साठी ₹800).
- अन्य सुविधांचा समावेश:
- दाब नियंत्रक (प्रेशर रेग्युलेटर) – ₹150
- एलपीजी होज – ₹100
- गॅस कार्ड – ₹25
- निरीक्षण/इंस्टॉलेशन/प्रात्यक्षिक शुल्क – ₹75
- मोफत पहिला रिफिल आणि स्टोव्ह: तेल विपणन कंपन्या (OMCs) लाभार्थींना पहिले रिफिल आणि स्टोव्ह मोफत देतात.
योजना पात्रता:
- किमान 18 वर्षांची महिलांनी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- अर्जदाराचे घरात अन्य कोणतेही एलपीजी कनेक्शन असू नये.
- योजनेच्या अंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलांनी खालील पैकी एका गटात मोडले पाहिजे:
- अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST)
- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)
- सर्वात मागासवर्गीय
- अंत्योदय अन्न योजना (AAY)
- चहा आणि माजी चहाचे मळे, जंगलवासीय
- बेट आणि नदी बेटावर राहणारे लोक
- SECC कुटुंबे (AHL TIN)
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी लागणारे कागदपत्रे:
1. Know Your Customer(KYC)
2. Ration Card issued by the State from which application is being made/ other State Govt. document certifying family composition/ Self-Declaration as per Annexure I (for migrant applicants)
3. आधार कार्ड
4. ऍड्रेस प्रूफ / रहिवासी प्रमाणपत्र
5. बँक अकाउंट पासबुक
Pradhan Mantri Ujjwala Yojana 2024
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:
-
- आपल्याला अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करता येईल किंवा जवळच्या एलपीजी वितरकाकडून फॉर्म मिळवता येईल.
- फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरावी. त्यात वैयक्तिक तपशील, बँक खाते माहिती, आणि एलपीजी वितरकाची निवड समाविष्ट आहे.
- आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म भरावा.
- जवळच्या एलपीजी वितरकाकडे पूर्ण केलेला अर्ज आणि कागदपत्रे सादर करावी.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
-
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 साठी अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा (अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा).
- LPG वितरण कंपनी निवडा आणि ऑनलाइन फॉर्म भरा.
- अर्जाचा संदर्भ क्रमांक मिळवा आणि जवळच्या गॅस एजन्सीला भेट द्या.
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट App वरून | Mazi Ladki Bahin Yojana App | Narishakti Doot App 2024 जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
This page includes info about pradhan mantri ujjwala yojana 2.0, pradhan mantri ujjwala yojana 2023, pradhan mantri ujjwala yojana form, pradhan mantri ujjwala yojana 2.0 online apply 2023, pradhan mantri ujjwala yojana form fill up, pradhan mantri ujjwala yojana gas price, pradhan mantri ujjwala yojana eligibility, pradhan mantri ujjwala yojana 2023 online apply