Mahila Samman Savings Certificate 2024 (महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 2024): महिलांच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ने सर्व वयोगटातील महिला आणि मुलींसाठी अर्थसंकल्पात एक बचत योजना सुरू केलेली आहे ज्याचे नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC). या मध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांना कोणत्याही जोखमीचा सामना न करता हमखास उत्तम परतावा मिळणार आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Samman Savings Certificate) ही योजना वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश भारतातील प्रत्येक मुलगी व महिलांना आर्थिक सुरक्षा पुरवणे आहे. २७ जून २०२३ रोजी एका ई-गॅझेट अधिसूचनेद्वारे आर्थिक व्यवहार विभागाने सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकांना ही योजना लागू करण्यास आणि कार्यान्वित करण्यास परवानगी दिली. यामुळे मुलगी व महिलांसाठी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेणे शक्य होईल. ही योजना १ एप्रिल २०२३ पासून पोस्ट विभागाच्या मार्फत कार्यान्वित झाली असून, ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत वैध आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 2024 तपशील:
तपशील | योजनेचा तपशील |
योजनेचे नाव | महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना |
योजनेचा उद्देश्य | आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देणे. |
लाभार्थी | सर्व वयोगटातील महिला आणि मुलींसाठी |
लाभ | ठेवलेल्या रकमेवर वार्षिक ७.५% दराने व्याज मिळेल |
अधिकृत वेबसाइट |
येथे क्लिक करा |
लाडकी बहीण योजने बाबत मोठी घोषणा नियम पुन्हा बदलले, फक्त बदललेले नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
Mahila Samman Savings Certificate 2024
योजनेचा उद्देश:
- सर्व मुली व महिलांसाठी आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय प्रदान करणे आहे
- योजनेत वार्षिक ७.५% निश्चित व्याज मिळवून देणे, जे त्रैमासिक चक्रवाढ पद्धतीने जमा होते.
- व्याज दर त्रैमासिक चक्रवाढ पद्धतीने जमा करून देणे.
योजना लाभार्थी:
सर्व वयोगटातील मुली आणि महिला
योजनेची वैशिष्ट्ये:
- सर्व मुलगी व महिलांसाठी आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय उपलब्ध करणे.
- या योजनेत ३१ मार्च २०२५ पर्यंत खाते उघडता येईल, ज्याची मुदत दोन वर्षांची असेल.
- या योजनेत ठेवलेल्या रकमेवर वार्षिक ७.५% दराने व्याज मिळेल, जे त्रैमासिक चक्रवाढ पद्धतीने मिळेल.
- किमान ₹१,०००/- व ₹१००/- च्या पटीत कोणतीही रक्कम ठेवली जाऊ शकते, परंतु जास्तीत जास्त मर्यादा ₹२,००,०००/- आहे.
- या योजनेत खाते उघडल्यानंतर दोन वर्षांनी गुंतवणूक परिपक्व होईल.
- गुंतवणुकीत लवचिकता असून, खातेधारक खात्याच्या मुदतीत ४०% पर्यंत रक्कम काढू शकतो.
योजना पात्रता:
• अर्जदार भारतीय नागरिक असावेत.
• ही योजना केवळ महिला व मुलींसाठी आहे.
• कोणतीही महिला या योजनेत अर्ज करू शकते.
• अल्पवयीन मुलींसाठी पालकाने खाते उघडता येईल.
• कोणतेही वयाचे बंधन नाही आणि सर्व वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी लागणारे कागदपत्रे:
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. उत्पन्नाचा दाखला
4. जन्म दाखला
5. रहिवासी प्रमाणपत्र
6. जातीचे प्रमाणपत्र
7. रेशन कार्ड(पिवळे किंवा केशरी)
5. अपंग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र
6. शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र
7. विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र
6. मोबाईल क्रमांक
7. पासपोर्ट आकाराचे फोटो
खात्यातून पैसे काढणे:
- खाते उघडल्यानंतर एक वर्षाच्या आत परंतु परिपक्वतेच्या अगोदर, खातेधारक पात्र शिल्लक ४०% पर्यंत काढू शकतो.
- अल्पवयीन मुलीच्या वतीने खाते उघडले असल्यास, पालक निर्दिष्ट प्रमाणपत्र सादर करून मुलीच्या फायद्यासाठी पैसे काढू शकतो.
- खात्यातून काढलेल्या रकमेची गणना करताना, कोणत्याही रकमेचा कणिश हिस्सा जवळच्या रकमेपर्यंत वाढवला जाईल
प्रारंभिक बंद:
- खाते परिपक्वतेपूर्वी बंद केले जाऊ शकत नाही, अपवाद खालीलप्रमाणे:
- खातेदाराच्या मृत्यूनंतर.
- खातेदाराच्या जीवघेण्या आजारासाठी वैद्यकीय सहाय्य किंवा पालकाच्या मृत्यूनंतर, जर खात्याचे संचालन किंवा सुरू ठेवणे खातेदारासाठी त्रासदायक होत असेल.
- जर खाते उघडल्यानंतर सहा महिन्यांनी इतर कोणत्याही कारणाने खाते बंद केले गेले, तर त्या खात्यातील शिल्लक रक्कम दोन टक्के कमी व्याज दराने मिळेल.
Mahila Samman Savings Certificate 2024
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
- जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेत किंवा नियुक्त बँकेत भेट द्या.
- अर्ज फॉर्म मिळवा किंवा अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करा.
- फॉर्मसाठी येथे क्लिक करा किंवा अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा (जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये हाच फॉर्म सध्या कार्यरत असल्याची खात्री करून घ्या)
- अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्राचे झेरॉक्स जोडा.
- अर्ज प्रक्रिया संपूर्ण झाल्यावर ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजनेत गुंतवणुकीचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करा.
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट App वरून | Mazi Ladki Bahin Yojana App | Narishakti Doot App 2024 जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
This page includes info about mahila samman savings certificate, mahila samman savings scheme, mahila samman savings certificate scheme, mahila samman savings certificate calculator, mahila samman savings, mahila samman savings certificate interest rate, mahila samman savings certificate sbi, mahila samman savings certificate 2023, mahila samman savings certificate post office, mahila samman savings scheme calculator